गेल्या 17 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेमध्ये आहे परशु भैयाचे हॉटेल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरातील मुख्य चौकात परशुभैयाची हॉटेल असे प्रसिद्ध असून या हॉटेलमध्ये ग्राहकांची 24 तास सेवा केली जाते सदर हॉटेलमध्ये स्वादिष्ट मुरमुरा चिवडा, उत्तम चहा यासह पाणी बॉटल लस्सी पापडी व अन्य पदार्थ स्वादिष्ट बनवीत असल्याने येथे प्रचंड ग्राहकांची वर्दळ सातत्याने दिसून येत आहे. गेल्या 17 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेमध्ये परशु भैयाचे हॉटेल असताना यामध्ये महानंदा दूध एजन्सी देखील उपलब्ध आहे एवढेच नसून कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये नायगाव शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःहून चहापाण्याची सोय त्यांनी मोफत रित्या परशु भैया हे केलेले आहेत. परशु भैय्या आमच्या शिवशाही न्यूज प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले की मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली यात मी खूप समाधान आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा