कामगारांच्या सुरक्षिततेसाठी चेअरमन अभिजीत पाटील यांनी उचलले सत्य पाऊल
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचान्यांना काम करताना आपली सुरक्षा कशी बाळगावी याविषयीची सखोल माहिती देणेसाठी लोभस कन्सल्टंट, पुणे यांची कारखान्याने नेमणुक केलेली आहे.
सदर प्रशिक्षणासाठी श्री प्रमोद सुरने, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, सोलापूर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी साधारण सुरक्षेचे नियम, आद्योगिक सुरक्षीतता, कार्य परवाना, टूल बॉक्स टॉक, मॉकड्रीलचे महत्व, कामावर असताना अयोग्य कपड्यांचे धोके अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच इतर साखर कारखान्यामध्ये झालेल्या अपघातांचे अनुभव उदाहरणादाखल सांगुन साखर कारखान्यामध्ये सदर अपघातांची पुर्नावृत्ती होवू नये या करीता उपस्थिता समवेत चर्चेच्या माध्यमातून उपाययोजना सुचविल्या.
तज्ञ प्रशिक्षक श्री धनंजय इनामदार यांनी प्रात्यक्षिकाव्दारे वैयक्तीक सुरक्षा साधने बद्दल माहिती देवून प्रत्यक्षात कशी वापरावी, अग्निशामक उपकरणाचा वापर व खेळाच्या माध्यमातून धोका ओळखण्याची कला अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, सोलापूर यांनी उत्पादना बरोबरच कामगारांचे सुरक्षीततेबद्दल राबविणेत येत असलेल्या कामगार सुरक्षा उपक्रमाबद्दल कारखाना व्यवस्थापन मंडळाचे कौतुक केले.
यावेळी कारखान्याचे व मैनेजर मु.के. तावरे, चिफ केमिस्ट बी. आर. माने, डिस्टीलरी मैनेजर, सोळंके एन.एस., लेबर अॅण्ड वेलफेअर ऑफिसर ओ. जे. अवधुत, डे. चिफ केमिस्ट एस. बी. माळवदे, डे. चिफ इंजिनिअर के.डी.कोळेकर, कार्यालयीन अधिक्षक श्री ए.एम. कपले तसेच कारखान्याचे सर्व इंजिनिअर, केमिस्ट व इतर कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा