नयनरम्य अतिषबाजी, पालखी,गणगवळण,भारुड व यात्रेच्या दिवशी काल्याचे किर्तन व जंगी कुस्त्यांचा फड असे कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्य़ाच्या नायगांव तालुक्यातील रातोळी येथील जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या श्री.रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवात प्रतिवर्षा प्रमाने या वर्षीहि किर्तन सप्ताह सोहळा आणि यात्रेच्या एक दिवस अगोदर नयनरम्य अतिषबाजी, पालखी,गणगवळण,भारुड व यात्रेच्या दिवशी काल्याचे किर्तन व जंगी कुस्त्यांचा फड असे कार्यक्रम करण्यात आले. व यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सर्वांचांच आवडता असलेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच लावणी,कलामहोत्सव मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला.
या कार्यक्रमातुन दरवर्षी नवनविन कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत असते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालकलाकारांणी गणपतीची आरति करून या लावणी कलामहोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमा मध्ये डान्स ऑकाडमी नायगाव येथील पहिली ते पाचवि च्या विद्यार्थ्यांनी 'आहो शेठ लई दिसानी झालीय भेट' हि लावणी खुप खुप सुंदर सादर केली. तसेच जि.प.प्राथमिक शाळा शेळगाव येथील शुन्य ते पाच वयोगटातील विद्यार्थ्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार या गितासह झाली 'खंडोबाची बानु धनरीन' हे गित फार फार सुंदर आशा प्रकाराचे सादर केले,त्यानंतर नराशाम विद्यालय रातोळी च्या विद्यार्थ्यांनी एक मराठी लोकनृत्य, 'नथ मोत्याची नाकामधी' हे खुप छान प्रकारे सादर करण्यात आले.व जि.प.मुलींची शाळा मुखेड येथील विद्यार्थ्यीनी आकांक्षा वाघमारे यांनी हि जोरदार लावणी सादर केली.व या कार्यक्रमा मध्ये जि.प.शाळा रातोळी, ईगल ईंगलीश स्कूल रातोळी सह अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी,व कलाकारांनी या लावणी,कलामहोत्सवा मध्ये भाग घेऊन आपआपली कला लावणी,लोकनृत्य,गितावर डान्स असे सांस्कृतिक आपआपली कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमा मध्ये उपस्थित असलेले पत्रकार नागोराव पाटील बंडे आलुवडगावकर,पत्रकार शिवाजी कंटूरकर, पत्रकार देशपांडे कृष्णुरकर यांचा श्री.रोकडेश्वर महाराज यात्रा कमेटि च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व तसेच नांदेड येथील डाॅ.सानवि जेटवानी यांचाही सत्कार करण्यात आला.या वेळी बोलताना म्हणाल्या लोककला,व लावणी,संस्कृती कला हे रशिक प्रेक्षक विसरत असल्याची खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या येणाऱ्या पिढिने लोककला,लावणी,संस्कृती जिवंत ठेवण्याची गरज आसलयाचे म्हणाले, ते स्वताहा भारताची निवडणुक दुत,व स्वच्छता दुत असल्यामुळे त्यांनी निवडणुक,व स्वच्छतेचा सामाजिक खुप छान असा संदेश दिला.या कार्यक्रमाचे परिवेक्षक डाॅ.सानवि जेटवानी व बैस सर हे होते, या लावणी,कलामहोत्सवात भाग घेऊन पहिला,दुसरा,तिसरा व आलेल्या काहि कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते रोख रककमेंचे बक्षीसीसे देण्यात आली.
या लावणी,कलामहोत्सव कार्यक्रमास यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवराज पाटील, सचिव व्यंकटराव टाकळे, सदस्य दत्तराम पाटील,नंदकुमार पाटील, कमिटी सदस्य विश्वांभर पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टि.जि.पाटील रातोळीकर,सरपंच प्रतिनिधी पिराजी पा.देशमुख,रातोळी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक बि.जि.पाटील रातोळीकर,विजय पाटील,अंकुश पाटील, शिवाजी पा.लुगांरे,उपसरपंच धम्मानंद कांबळे,विलास माऊलगे,मलीकारजुन स्वामी,गोविंद गुत्ते व समस्त रातोळी चे गावकरी यांनी या कार्यक्रमासाठि अतोनात परिश्रम घेऊन लावणी,कलामहोत्सव,सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी रित्या साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्ह्यातील,तालुक्यातील,व परिसरातील हजारो लोंकाची ऊप स्तीथी फार मोठ्या प्रमाणात होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा