एक ना धड भाराभर चिंध्या
नांदेड प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
हदगाव तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) चे डॉक्टर व कर्मचारी असून नसल्यासारखेच. असल्याची गत आलेली आहे .मराठा क्रांती दल महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष गजानन पतंगे यांनी माहिती अधिकार 2005 नुसार 23 /12/ 2022 रोजी माहिती मागितली होती .परंतु त्या माहितीमध्ये अर्धवट माहिती व असमाधानकारक असून वाहनाचे लॉग बुक प्रति मागितल्या तरि सुद्धा उपलब्ध करून दिल्या नाहीत किंवा त्याची माहितीसुद्धा दिली नाही .यामुळे शासन राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर कर्मचारी शाळा व अंगणवाडी तपासणीचे सोंग करत असल्याचे निदर्शनात येत आहे. तरीसुद्धा उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथील वैद्यकीय अधीक्षक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे .शासन राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) या उपक्रमा अंतर्गत लाखो ,करोडो रुपये खर्च करीत आहे परंतु तेथील कर्मचारी हे घरी बसून कागदपत्री काम करीत असल्याचे दिसून येत आहे, याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अन्यथा मराठा क्रांती दल महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष गजानन पतंगे व संपूर्ण टीम आमरण उपोषण करण्याची तयारी करतील असे आमच्या प्रतिनिधीशि संवाद साधला आहे..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा