युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी तळागाळापर्यंत गड पोहचविण्यासाठी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पुन्हा गत वैभव मिळवून देण्यासाठी युवा सेनेची पुनर्बांधणी सुरू असून युवासेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख विशाल सावंत हे याच अनुषंगाने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत . या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध शाखांचे अनावर होणार असून ते युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. या सर्व शाखा अनावरण कार्यक्रमास आणि बैठकीस नांदेड उत्तर विधानसभा, लोहा कंधार आणि भोकर विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख गजानन कदम यांनी केले आहे.
युवा सेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख विशाल सावंत हे उद्या दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता देवगिरी रेल्वेने नांदेड येथे येणार आहेत. नांदेड रेल्वे स्थानकावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजता वर्कशॉप , जंगमवाडी, कॅनॉल रोड, भावसार चौक, छत्रपती चौक येथील शाखांचे विशाल सावंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे नांदेड उत्तर, लोहा कंधार आणि भोकर विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे .
दुपारी तीन वाजता विशाल सावंत हे भोकरकडे रवाना होतील. दुपारी चार वाजता भोसी, साडेचार वाजता आमदरी , पाच वाजता हनुमान नगर भोकर, सव्वा पाच वाजता फरीद नगर भोकर ,साडेपाच वाजता पवार कॉलनी भोकर येथे शाखांचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता भोकर येथील शासकीय विश्रामगृहात ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत . सायंकाळी पावणे आठ वाजता बारड येथे पदाधिकाऱ्यांशी हितगुज साधणारा असून रात्री नऊ वाजता ते नांदेड येथे मुक्कामी येणार आहेत. संपर्कप्रमुख विशाल सावंत यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या सर्व शाखांच्या अनावरण आणि बैठकांना नांदेड उत्तर ,लोहा कंधार आणि भोकर विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख गजानन कदम यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा