जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीबद्दल, गंगाधर कोतेवार यांचा नायगावात सत्कार
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
समाजाच्या विविध प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवणारी महाराष्ट्रातील लढाऊ संघटना लहुजी शक्ती सेना या संघटनेची चळवळ गतिमान करण्यासाठी नांदेड जिल्हा युवक उपाध्यक्षपदी बिनविरोधपणे समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत गंगाधर कोत्तेवार होटाळकर यांची निवड करण्यात आली असल्याने त्यांच्या मित्र परिवारांच्या वतीने नायगावात सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील मौजे होटाळा येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत सक्रिय भाग घेऊन विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लहुजी शक्ती सेना या लढाऊ संघटनेत नांदेड जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली असल्याने नायगाव शहरात ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण, माधव बैलकवाड, शेख आरीफ, शिवाजी कुंटूरकर,यासह माजी उपसरपंच नामदेव गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड, केशव गायकवाड यांनी गंगाधर कोत्तेवार यांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे मनस्वी अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा