विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केले महिला मेळाव्याचे उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
सगरोळी येथे कृषी तंत्रज्ञान व दशकपूर्ती तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला.या तीन दिवसीय महोत्सव चा आज दि.१६ फेब.दुसरा दिवस आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला आजच्या महिला मेळाव्याचे उद्घाटन अध्यक्ष उपसभापती विधानपरिषद,महाराष्ट्र राज्याचे मा.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वर्षा ठाकूर - घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प.नांदेड, मा.श्री.नितीन शर्मा राज्य प्रकल्प व्यवस्थापक reliance foundation, मा. डॉ.संजय तुबाकले प्रकल्प संस्थापक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड, मा. श्री.चांदांसिंग राठोड जिल्हा समन्वय अधकारी मा. वि. म.नांदेड,यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमात सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री. भारत पाटील (आप्पा) कोल्हापूर आणि प्रा.डॉ.जया बंगाळे सहयोगी अभिस्टाता व प्रा.सामुदायिक विज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक म. कृ.वी.परभणी. यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान व दशकपूर्ती महोत्सव मध्ये काल तृणधान्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामधे परिसरातील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना आज उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. वर्षा ठाकूर - घुगे ,मुख्य कार्यकारी अधिकारी,जी. प.नांदेड, महिलांविषयी बोलत महिला शेती, शिक्षण,कला, सर्व्हामध्ये सामोरे आहेत. महिलांमध्ये व्यायसायची शेतीची आणि शिक्षणासाठी प्रवित्ता आहेत.वर्षा ठाकूर मॅडम यांनी महिलांना हिरकणी अशी उपमा दिली. महिला कुठेही कमी नाहीत फक्त संधी मिळाली पाहिजे असा वक्तव्य दिले.
नितीन शर्मा, reliance foundation चे नेतृत्व करत महिलांनी व्यवसायाकडे जावे महिलांनी व्यवसाय करावा असा म्हटले.ग्रामीण विकास आणि शिक्षण याबद्दल बोलले.चंदांसिंग राठोड जिल्हा समन्वय अधिकारी मा.वी. म.नांदेड,महिलांना जिल्ह्यात व्यवसाय मानून micro planing व्यवसाय उपलब्ध करून करून दिले.त्यामधे जिल्ह्यात चार ते पाच दालमिल चालू करून महिलांना व्यवसाय दिला.अशी माहिती चंदन सिंग राठोड यांनी दिली.भारत पाटील आप्पा कोल्हापूर, महिलांना रणरागिणी नावाने संबोधात महाराष्ट्रातील सर्व महान थोर महिला यांच्याबद्दल महिलांना सांगून व्यवसाय,शिक्षण याचे महत्त्व जाणून दिले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा