तलाठ्याचे निलंबन करण्याची लाभार्थ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे अंतरगाव येथील संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या एका सत्तर वर्षीय वर्धांची महसूल विभागाच्या तलाठीमार्फत हेळसांड करण्यात येत असून सदर जिवंत असतानाही त्यांना मयत दाखवून लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अंतर्गत सध्याचे तलाठी लांडगे यांना निलंबित करावे अशी मागणी सदर लाभार्थी गंगाराम मरिबा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन केले आहे.
मी जिवंत असताना मला मयत दाखवून तसा अहवाल तहसील कार्यालय नायगाव यांच्याकडे दाखल करून मला संजय गांधी निराधार योजनेचा आर्थिक लाभांपासून वंचित ठेवून माझ्यावर अन्याय करणाऱ्या तसेच जिवंत माणसाला मयत दाखविणाऱ्या बेशिस्त तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामाची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अन्यथा मला न्याय मिळविण्यासाठी नायगाव तहसील कार्यालय समोर उपोषणास बसण्याची वेळ आली. अशी परिस्थिती गंगाराम मरिबा पवार यांच्यावर आली आहे. महसूल विभागांमध्ये कर्मचारी व त्यांच्या बेशिस्त पणामुळे वारंवार चर्चेत असतात.
तलाठ्यांनी आपल्या बेशिस्त पणाचा कहर करून एका 65 वर्षीय वृद्धास मयत दाखवून त्याच्या अनुदानापासून त्याला वंचित ठेवले सदर तलाठी अंतरगाव अंतर्गत सज्जामध्ये दहा वर्षापासून चिकटून बसला आहे. त्यामुळे त्यांना रेती, मुरूम, फेरफार, माती उत्खननासाठी परवानगी देने, महसूल खूप महसूल मिळत आहे. यामुळे एका वयोवृद्ध गंगाराम मरिबा पवार रा.अंतरगाव यांना मयत दाखविणाऱ्या लांडगे तलाठी यांना नायगाव तहसीलदार चे आशिर्वाद आहे का. आशा प्रश्न विचारला जातो आहे. सदर मदमस्त कर्मचारी तलाठी यांची चौकशी करून सदर लाभार्थ्यांना त्याचे पाच महिन्याचे राहिलेले अनुदान तलाठी यांच्या पगारीतून देण्यात यावे अन्यथा त्यांचे विरुद्ध उपोषण धरण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती गंगाराम पवार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी तहशिलदार गजानन शिंदे काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा