महाराष्टातील सतरा व्यक्तिंनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांची दखल घेऊन पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड जिल्ह्य़ातील नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील भूमिपुत्र दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट चे संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव विश्नंनाथराव पा.कुंचेलीकर यांनी दिव्यांग,वृध्द,निराधार यांना न्याय मिळवून देण्याचे उत्कृष्ट सामाजिक कार्य केलेल्या कामांची ऑनलाईन दखल शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतिने घेऊन त्यांना पुण्यात ' शिवस्वराज्य पंढरीरत्न ' पुरस्कार देण्यात आला.
शिवस्वराज्य युवा संघटनेच्या पाचव्या वर्धापण दिनानिमित्य दिनांक12फेब्रुवारी २०२३ रोजी चैतन्य सभागृह नवीन पवनानगर, ब चिंचवड,पुणे-33 येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव,तर प्रमुख पाहुणे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय महेश डोंगरे-पाटील,पिंपरी चिंचवड काँग्रेस कामगार नेते कैलास (भाऊ)कदम,ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बापट साहेब, समाजसेवक संजय बाबा ननवरे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक सुनिल भाऊ डोंबे,पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक महादेव धोत्रे,हे उपस्थित होते.
या पुरस्कार वरील मान्यवराच्या हस्ते दिव्यांग,वृध्द, निराधाना न्याय मिळावा म्हणुन सतत संघर्ष करनारे दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव विश्नंनाथराव डाकोरे नांदेड यांना ट्राफी सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन माँसाहेब जिजाऊ यांचे १४वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधवव ईतर मान्यवराच्या हस्ते गौरव करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
महाराष्टातील सतरा उत्कृष्ट काम करनाऱ्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- संपादक पत्रकार मिर्झागालिब रज्जाक मुजावर मांजरी
- उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे
- उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक रविंद्र भाऊसाहेब जगदाळे तळेगाव
- उत्कृष्ट वकील अँड वैशालीताई चांदणे पर्वती पायथा पुणे
- उत्कृष्ट शैक्षणिक शिक्षक प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर अकलूज
- उत्कृष्ट उद्योगजिका आशाताई राजेश इंगळे काळेवाडी
- उत्कृष्ट डाॅ.वैद्यकीय आबासाहेब पांडूरंग रणदिवे
- उत्कृष्ट सामाजिक प्रतिष्ठान शरदचंद्र बाजीराव आढाव राशीन
- उत्कृष्ट सायकलिंग रंणीग अंजली अशोक रानवडे पिंपरी चिंचवड
- उत्कृष्ट सिनेमा कलाकार दशरथ दिनकर पाचारणे वाघोली
- उत्कृष्ट साहित्य लेखक मल्हारराव नाचण डोणगावकर छत्रपती संभाजी नगर
- वारकरी संप्रदाय ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव परभणी
- उत्कृष्ट फोटोग्राफी बशीर मुन्ना शेख पंढरपूर
- उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक शीघ्र कवी अशोक दत्तात्रय गाडे नेवासा
- जेष्ठ समाजसेवक यशवंत गंगाराम कन्हेरे पिंपरी चिंचवड आकुर्डी
उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी संदिप सुभाष जाधव-पाटील गुरसाळे पंढरपूर
यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील, शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र किंटे,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष यश घरत, विद्यार्थी प्रदेश संघटक रूपेश जाधव, पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे सर्व पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते अशी प्रसिध्दी दिली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा