राष्ट्रीय जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
सुजलेगाव येथे राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनें अंतर्गत 'हर घर नल... हर घर जल या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी 03 वाजता आ.राजेश पवार ,राजेश देशमुख कुंटूरकर ,बाबासाहेब पा.हंबर्डे, आदींच्या शुभ हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नायगाव विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल आ. राजेश संभाजी पवार यांनी सदर योजनेची सखोल माहिती देताना असे म्हणाले की आपल्या सुजलेगाव येथे होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होत असलेले काम एक कोटी ते नव्यानो लाखाचे आहे.हे काम एकदा झाल्यावर कमीत कमी ३० वर्ष योजना मिळत नाही.त्याकरिता गावकऱ्यांनी योग्य काम करून घ्यावे असे त्यांनी गावकरी याना सांगितले.
सुजलेगाव या गावाची संख्या जवळपास एक हजाराच्या वर असून सव्वादोनसे ते अडीचशे च्या जवळपास कुटुंब आहेत. जर कोणत्या कुटुंबांची नळ जोडणी ऑनलाइन नोंद करायची असेल तर त्यांनी करावी व ग्रामसेवक यांनी सुद्धा करून घ्यावे असेही आवाहन आ.राजेश पवार यांनी केले.पुढे बोलताना आ.पवार असे म्हणाले की कै. गंगाधरराव देशमुख साहेबानी माझ्या परिसरातील शिल्लक राहिलेल्या विकासाकडे लक्ष देऊन ते कामे पूर्ण करण्याचे सांगितले होते.म्हणून त्याच प्रमाणे होईल तेवढा जास्तीचा निधी कुंटूर सर्कलमध्ये दिलेला आहे..अजून शिल्लक राहिलेल्या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून शेळगाव ते दुगाव हा रस्ता लगेच होणार असल्याचेही आ.राजेश पवार यांनी सांगितले.
कुंटूर सर्कलचे नेते मार्गदर्शक राजेशजी देशमुख कुंटुरकर साहेब व डिप्टी इंजिनिअर सरनाईक, माजी. सभापती बाबासाहेब हंबर्डे, ग्रामसेवक बी.जी. जाधव, सय्यद साहेब ,विठलवार साहेब तसेच मा. पंचायत समिती सदस्य लक्ष्मनराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कुऱ्हाडे ,गजानन शिंदे ,हानमंत बोटलावार ,संजय सुर्यकार ,प्रविण सुर्यवंशी, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन गंगाधर पा. कुऱ्हाडे मा. सरपंच भगवानराव देशमुख मा. पंचायत समिती सदस्य गंगाराम नव्हारे नागोराव डुमने मा. सरपंच एम डी कदम पत्रकार राजेश कुलकर्णी,पत्रकार दिगांबर मुदखेडे राजेश बकवाड,मारोती कोंचमवाड बाबुराव देवाले हानमंत जाधव पांडुरंग वडजे आनंदा पांचाळ दिपक जाधव, बळिराम जाधव मारोती कदम शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रंगराव कदम मा. सरपंच माधवराव मुकदम, सोनबा पा.शिंदे, माजी उपसरपंच जे पी ईबितदार, कपिल डुमने यशवंत कदम ,राजेश कुऱ्हाडे, राजेश शिंदे गणेश ईबितदार नारायण वाघमारे दिगांबर वडजे व सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत पेयजल योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा