maharashtra day, workers day, shivshahi news,

सातेगावच्या गुरुजींनी सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला

आईच्या मृत्यूनंतर तेरवी टाळून शाळेला दिले 65 हजाराचे वॉटर फिल्टर
Avoiding Teravi after mother's death, Water filter worth 65 thousand was given to the school, Social transformation by teacher, Sategaon, naigaon , nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे सातेगाव येथील कै.कमलबाई किशनराव जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा असलेले  विलास किशनराव पाटील जाधव सहशिक्षक यांनी सामाजिक  परिवर्तनाचा पाया रचण्याचे काम स्वतःपासून सुरू केले आहे.. बालपणापासूनच विलास गुरुजींना सामाजिक परिवर्तनाची ओढ आहे .ते नेहमीच गावातील तसेच नोकरीच्या गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत असतात. सोबतच परिवर्तनातवादी विचार युवकांसमोर ठेवण्याचे काम नेहमी करत असतात.
याचाच एक भाग म्हणून कै.कमलबाई किशनराव जाधव(आई) यांच्या मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे असणारा तेरवीचा कार्यक्रम टाळून त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस नगदी स्वरूपात 65 हजार रुपयांची मदत दिलेली आहे. यातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टर च्या रूपाने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच लागणारे टीन शेड आणि प्रतिवर्षी येणारा दुरुस्ती खर्च ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे.यामुळे परिसरातील नागरिकांतून तसेच शिक्षक वर्गातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजींनी व पालक ग्रामस्थ त्यांचे आभार मानले. आपण राखलेले सामाजिक भान हे निश्चितच दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि आमच्या गावासाठी हा एक आदर्श उपक्रम श्री विलास किशनराव जाधव यांनी राबवून निश्चितच सामाजिक परिवर्तनाचा पायाच रचला आहे,अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.तसेच दप्तर मुक्त शाळा  उपक्रमांतर्गत शाळेमध्ये आज माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री मारुती नारायणराव दगडूमवार अर्थात प्राध्यापक बाळू  दुगडूमवार सर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत सर्व गावकऱ्यांसमोर शाळेतील इयत्ता सातवीचे विद्यार्थी आदर्श गौतम जोंधळे व अदिती संतोष लंगोटे यांनी घेतली. ही मुलाखत ऐकून गावकरी अतिशय आनंदी झाले आणि विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या क्रीडा स्पर्धाबद्दल बक्षीस वितरणाचा ही कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना विविध प्रकारची बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी परिसरातील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉ. बाळू दुगडूमवार सर,गावातील प्रथम नागरिक सौ.निलूबाई गोविंद पामलवाड, उपसरपंच प्रतिनिधी  परमेश्वर जाधव, सौ.सुरेखा जाधव ग्रामपंचायत सदस्या , नामदेव जाधव, शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक  नागेश येरसनवार साहेब,  प्रकाश व्यंकटराव जाधव,  पांडुरंग शेषराव जाधव,  बालाजी जयराम जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, संतोष अशोक लंगोटे,  अशोक रावसाहेब जाधव,  यदुराज भुजंगा जाधव, संजय व्यंकटराव जाधव,  परशुराम लंगोटे पोलीस पाटील,  व्यंकटराव लंगोटे,  तिरुपती जाधव, शिवाजी जाधव,  बाबुराव जाधव तंटामुक्ती अध्यक्ष श्संदीप जाधव सुभाष जाधव  नागोराव गायकवाड  कोंडीबा जाधव  नारायण जाधव  काशिनाथ जाधव  जयवंत जाधव,  दत्ता गायकवाड  नामदेव जाधव श्री हरी जाधव  किशन जाधव  वसंत जाधव इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
तसेच शाळेला जलशुद्धीकरण यंत्र दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने  विलासराव किशनराव जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक  स्वामी सर, सहशिक्षक  शिंदे सर,  डांगे सर, मच्छेवार सर, जमदडे सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   देविदास जमदडे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक  स्वामी सर यांनी मानले.अशा पद्धतीने शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पडला.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !