आ. राजेश पवार यांच्या उपस्थितीत सौ. पुनम पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
धर्माबाद तालुक्यातील येवती येथे नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या वतीने भव्य शॉर्ट बाऊंड्री क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. पूनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा मैदानी खेळ म्हणून ओळख असलेल्या भव्य कुस्ती स्पर्धा देखील महाशिवरात्री दिवशी संगम येथे उत्साहात पार पडली आहे.
आमदार चषक क्रिकेट स्पर्धा म्हणून ही स्पर्धा पार पाडणार असून यात एकूण 50संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक 33333, द्वतिय 15555 व तृतीय पारितोषिक 9999 हे तीनही बक्षिसे आमदार राजेश पवार यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. भाजपा नेत्या जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या सौ. पूनम पवार, माजी तालुकध्यक्ष विजय पाटील डांगे यांच्या सह विविध मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थीत होते.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मोबाईलच्या युगात ग्रामीण भागाची ओळख असलेले मैदानी खेळ हळूहळू कमी होत आहेत त्यामुळं मैदानी खेळ टिकून राहणे काळाची गरज बनली आहे, यातुन खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळते व शारीरिक व्यायाम देखील होतो.असे प्रतिपादन यावेळी बोलताना भाजपा नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पुनम पवार यांनी केले आहे
तालुक्यातील तीर्थक्षेत्र संगम येथे महाशिवरात्री निमित्त आमदार राजेश पवार यांच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात महाराष्ट्र, तेलगणा दोन्हीं राज्यातली पैलवान व क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. सदरील कुस्ती स्पर्धेत एकूण चाळीस हजार रुपयांहून अधिक ची बक्षिस वाटप करण्यात आले. तसेच येवति येथिल क्रिकेट स्पर्धेत 50 संघ सहभागी झाले आहेत अशी माहिती भाजपा माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी दिली. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य रमेश आणा गौड, श्रीनिवास भुतावळे, रामचंद्र सोमठाने, बालाजी कौठे आदीजन उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा