कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक येथील शाळेमध्ये दहावी वर्गात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ काल दिनांक 25/2/2023 रोजी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.गीताताई बकवाड, प्रमुख पाहुणे प्रा.डां.गो.रा.परडे. प्रा.एस. व्हि.विरभदरे.उतमराव गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नायगाव नंदकुमार काकडे मंगेश हनवटे केंद्र प्रमुख सुजलेगाव, मुख्य अध्यापक संजय राजपुत्र सर, सहशिक्षक बाबुराव बावने , अरविंद जामकर सहशिक्षक,, सहशिक्षक , नेहरू सर, कचकलवाड, चव्हाण सर, पदमावारसर, गायकवाड सर, नितेवाडसर, वाघमारे सर, मिना चाटोरे मडम, शिनगीरे मडम, मुंडे सर, जाधव सर, दहावी वर्गातील कु. अरुणकुमार अनिल कांबळे,लाला शेख, आयुष्य झगडे, पवन देवघरे, विवेक कदम, अनिकेत कमळै, धनसिरी संगेवार, वैष्णवी सांगावे,निकीता नारे, नाजनीन शेख, अदि विद्यार्थी नी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री संजय राजपूत सर होते .
या कार्यक्रमासाठी नववीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या येतोचित सत्कार करून त्यांना दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांना निरोप दिला . सकाळी 10 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी व शिक्षक यांचे मनोगत व्यक्त कार्यक्रम सादर केले. दुसरया सत्रात स्नेह भोजन कार्यक्रम करण्यात आला. नववीतील विद्यार्थ्यां मिनाषी मिसाळ, श्रृती निवळे, वैष्णवी अनिल कांबळे, यांनी स्नेह भोजनाची व्यवस्था केली.
पुढील शिक्षणासाठी व पुढील कॉलेजच्या जीवनासाठी दहावीचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . निरोप समारंभ उत्कृष्ट रित्या सर्वांच्या भाषण व एकमेकांचे संवाद भाषण गीत गायन अशा पद्धतीने पार पडला. यामध्ये सर्वांनी स्नेह भोजनाचाही लाभ घेतला त्याच्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना भोजनाचा आस्वाद देण्यासाठी नववीतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी जेवण बनवून त्यांना आमंत्रित केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा