हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी करतात शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदर व्यापारी आडत दुकानदारावर नियंत्रण नसल्याने सुसाट सुटलेल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा कमी दराने माल खरेदी करून जास्त भाव मध्ये विक्री करून स्वतःचे चांगभले करत आहेत .
याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकराज यांचे तीळ मात्र हे नियंत्रण व्यापारी व अडकत दुकानदार यांच्यावर नसल्याचे शेतकऱ्यातून बोलल्या जाते कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कुंटूर बरबडा राहेर ,कुसनूर काहाळा, सुजलेगाव ,आवळा , सांगवी, बळेगाव अशा विविध ठिकाणी गावात व्यापाऱ्यांनी आपल्या अडत दुकाने थाटले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्याचा कापूस ,तुर ,, सोयाबीन ,हरभरा ,ज्वारी ,मुग ,उडीद, अशा विविध प्रकारचे धान्य खरेदी करतात या खरेदी करणाऱ्या धान्य मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या भावाला बाजूला सारून मर्जीप्रमाणे हमीभाव पेक्षा कमी भावाने खरेदी करून स्वतः व्यापारी चांगभले करत आहेत शेतकऱ्याला मात्र गरजेसाठी सदर धान्य विक्रीस नेऊन आपल्या शेतीमालाचे मजुरी द्यावी लागते.
भाव चांगले मिळतील याकडे प्रतीक्षा करत घरामध्ये कापूस हरभरा सोयाबीन दाबून ठेवण्याची वेळ आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या आडत दुकानदारांमध्ये काही घोडी काटे वापरतात त्याचबरोबर पक्की पावती देत नाहीत तसेच ज्यादा खरेदी करून साठवणूक जास्त प्रमाणात करत आहेत . याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यापेक्षा व्यापाराचे चांगभलं साठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व प्रशासक अधिकारी हे मात्र तपासणी करण्यास धजावत नाहीत सदर दुकानदाराचे पक्की पावती दुकानदाराचे नाव टॅक्स किती भरला जातो किती दुकाने कृषी उत्पन्न बाजार समितीला टॅक्स भरतात याची माहिती सुद्धा सचिव देत नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर येथे स्थापन होऊन कित्येक वर्षे झाली तरी नफा ना तोटा अशी परिस्थिती कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समितीची दिसून येत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही योजना व कोणतेही नियम पाळले जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कुंटूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा