राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनजागरण यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ
शिवशाही वृत्तसेवा बुलढाणा, (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
सिंदखेड राजा - दि. २४ फेब्रुवारी २०२४
महागाई , सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय मिळूवून देण्यासाठी मंत्रालयावर लाटणे मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सौ. विद्याताई चव्हाण यांनी केले. सिंदखेड राजा या ठिकाणी 24 फेब्रुवारी रोजी जनजागरण यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली त्यावेळी विद्या चव्हाण बोलत होत्या.
सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य समन्वयक डॉ. आशा मिरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शिवाजी राजे जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. अनुजा सावळे, यावेळी उपस्थित होते दिल्लीतील नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार खाली खेचण्यासाठी महिला रणरागिणी रौद्र रूप धारण करणार असल्याचे यावेळी त्यानी सांगितले यावेळी आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अन्याय करणार्यांचा कडेलोट केला. केंद्रातील व राज्यातील सरकार खाली खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा