समाजातून होत आहे शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नायगाव तालुक्यातील सालेगाव येथील रहिवासी व नांदेड येथे असलेले महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात कार्यरत असलेले बॉलीस्टर गणपती राचोटकर यांची नुकतीच नाभिक एकता महासंघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव अण्णासाहेब बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
नूतन जिल्हाध्यक्ष बॉलीस्टर गणपती राचोटकर यांनी यावेळी बोलताना सांगीतले की, नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नाभिक समाजाची एकजूट करुन नाभिक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार, नाभिक समाजाच्या नांदेड जिल्ह्यातील दुकानदारांना एकत्रित करुन दुकानदारांच्या व सर्व स्तरावर काम करणाऱ्यांच्या अडचणी व समस्यांचे निवारण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राचोटकर यांनी दिली.
सदरच्या नूतन कार्यकारिणीत सचिवपदी दिगंबर रोहिदासराव श्रीमंगले तर महिला शहराध्यक्षपदी सौ. सुरेखा बॉलीस्टर राचोटकर तसेच शहर उपाध्यक्षपदी सौ. सविता दिगंबराव श्रीमंगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून या निवडीने नांदेड जिल्ह्यातील नाभिक समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. बॉलीस्टर गणपती राचोटकर हे नेहमीच लोकांच्या सर्व समाजाचे जनतेच्या अडीअडचणीला धावून जाऊन मदत करणारे आहेत. मित्रपरिवार व समाजाच्या कामांमध्ये जनसामान्य गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडवणारे म्हणून परिचित आहेत त्यांच्या निवडीने नायगाव तालुक्यासह जिल्ह्यातून न्हावी समाज व सर्व समाज बांधव मित्र परिवाराकडून व सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा