maharashtra day, workers day, shivshahi news,

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर - आ. समाधान आवताडे

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा

mla samadhan autade, funds for electric dp, pandharpur, mangalwedha, shivshahi news,


शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये नवीन डीपी बसविण्यासाठी आणि क्षमतावाढसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी जनतेच्या जिव्हाळ्याची बाब असणाऱ्या डीपी सारख्या मुद्द्यावर आ. आवताडे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा सदर भरीव पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी उपलब्ध केला आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या अनेक गावांमध्ये नवीन डीपी मंजूर व्हावेत व असणाऱ्या डीपी क्षमतावाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी आ.आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. सदर मागणी लक्षात घेऊन आ. आवताडे यांनी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे ओलीताखाली असेलेल्या पीकक्षेत्रांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी या निधीची तरतूद आपल्या पदरात पाडून घेतली आहे.

 पंढरपूर तालुक्यातील डीपी मंजूर असणारी गावे पुढीलप्रणे - 

पंढरपूर शहर ११ डीपी, गादेगांव २ डीपी, कोर्टी ३ डीपी, वाखरी ४ डीपी, लक्ष्मी टाकळी ३ डीपी, कासेगाव २ डीपी, बोहाळी १ डीपी, उंबरगाव २ डीपी, खर्डी ३ डीपी, तपकीरी शेटफळ १डीपी, तनाळी १ डीपी.

 मंगळवेढा तालुक्यातील डीपी मंजूर असणारी गावे पुढीलप्रमाणे - 

मंगळवेढा शहर १२ डीपी, आंधळगाव ७ डीपी, खुपसंगी २ डीपी, गणेशवाडी १ डीपी, कचरेवाडी १ डीपी, लोणार ३ डीपी, भोसे ३ डीपी, नंदेश्वर २ डीपी, जालिहाळ १ डीपी, कात्राळ १डीपी, हुलजंती ३ डीपी, कागष्ट २ डीपी, येळगी १ डीपी, नंदूर १ डीपी, देगांव ३ डीपी, धर्मगांव १ डीपी, गुंजेगाव १डीपी, घरनिकी १ डीपी, शिरसी १ डीपी, शेलेवाडी १ डीपी, लक्ष्मी दहिवडी १ डीपी, सलगर बु.१ डीपी, सलगर खु.१ डीपी, येळगी १ डीपी, मरवडे १ डीपी, कात्राळ २ डीपी, अरळी २ डीपी, डोणज १ डीपी, चिक्कलगी २ डीपी, रड्डे २डीपी, लवंगी १ डीपी, माचणूर २ डीपी, दामाजीनगर १ डीपी, उचेठाण २ डीपी, बठाण १ डीपी, लोणार ३ डीपी, अरळी २ डीपी, बालाजीनगर २ डीपी, सिद्धापूर १ डीपी.


पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील डीपी उभारणी व क्षमतावाढीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून तब्बल ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे. सदर विकसनशील आणि शेतकरीहितकारक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. समाधान आवताडे यांची विकासाभिमुख कार्याची प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे.
राजकुमार यादव   
प्रगतशील बागायतदार (मारापूर )   

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !