रुई बुद्रुक तालुका नायगाव येथील दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रुई बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या एका गरीब कुटुंबातील 35 वर्षे शेतकऱ्यांनी सततच्या नापीकेला कंटाळून झाडाला पांढरा रंगाच्या दसती ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी सायकाळी ठीक चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या रुई बुद्रुक पासून जवळ असलेल्या शिवारात धुर्यावर गट क्रमांक ७३ मधील संभाजी गणपती पाटील महागावे यांच्या शेताच्याजवळ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर लक्ष्मण गंगातीरे वय 35 वर्ष रा. रुई बुद्रुक शेतकऱ्यांना अर्धा एकर जमीन असल्याचे सांगण्यात येते. सततच्या नापिकी, नेहमी कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी नेहमी हैराण होत होता. दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी बाहेरगावी जाऊन येतो म्हणून घरातून गेले होते . आणि त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु मी मिळून आला नाही दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी आत्महत्या केल्याचे उघड झाले. कुंटूर पोलिसांना माहिती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे आमदार कुमरे व घुमे यांनी पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन पोसटमारटम करण्यासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आसी माहिती कुंटुर पोलिसांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा