maharashtra day, workers day, shivshahi news,

पुढील सर्व निवडणूक समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय - भगीरथ भालके

 फटेवाडी ग्रामस्थांचे वतीने नुतन सरपंच,उपसरपंच,सदस्य व मान्यवरांचा सत्कार

sarpach, fatewadi, samvichari aghadi, mangalwedha, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा. ( राज सारवडे )

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका समविचाराच्या माध्यमातून लढवून झेंडा फडकवावा लागणार असलेचे सुतोवाच विठठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी फटेवाडी येथील नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलाताना व्यक्त केले

फटेवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील समविचारी आघाडीच्या नुतन सरपंच, सदस्य व दामाजी कारखान्याच्या नुतन संचालक मंडळाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते  फटेवाडी येथील औदुंबर वाडदेकर व रावसाहेब फटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झालेल्या सरपंच सिमाताई काळुंगे, उपसरपंच पल्लवी शिंदे व सर्व सदस्य यांच्यासह तालुक्यातील सविचारी आघाडीच्या माध्यमातून विजय मिळविलेल्या सरपंच व सदस्यांचा सन्मान यावेळी तालुक्यातील मान्यवर पदाधिका-यांच्या शुभहस्ते करण्यात आला  कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुध संघ व दामाजी कारखान्याचे संचालक श्री औदुंबर वाडदेकर यांनी करुन बिनविरोधची परंपरा कायम राखण्यात फटेवाडी गांव यशस्वी झालेने विकासासाठी प्रयत्न करणार असलेचे मत व्यक्त केले  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे, दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, युटोपियन कारखान्याचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक, प्रणव परिचारक, पंढरपूरचे दिपक वाडदेकर, पक्षनेते अजित जगताप, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, बसवराज पाटील, राजेंद्र चरणु पाटील महादेव लुगडे, भारत बेदरे, छत्रपती परिवार मरवडेचे सुरेश पवार, तानाजी कांबळे, भारत पाटील, शिवाजी नागणे, दिगंबर भाकरे, प्रविण खवतोडे उपस्थित होते  

सदर प्रसंगी बोलताना प्रा शिवाजीराव काळुंगे म्हणाले,समाज नेहमी चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभा रहात असतो  काम करताना त्रास होत असतो परंतु शेवट गोड होतो  फटेवाडी ग्रामस्थांनी बिनविरोधचा मार्ग काढून गावच्या विकासाला हातभार लावला असून नवीन सरपंच सिमाताई काळुंगे यांनी चांगले काम करावे माझा आशीर्वाद व सहकार्य नेहमीच राहील  दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचे निमित्ताने समविचारी आघाडीची संकल्पना उदयास आली  मा भगीरथदादांच्या म्हणण्याप्रमाणे आपले तालुक्यातील सर्व निवडणुका समविचारी आघाडीच्या माध्यमातून सामोपचारातून लढविण्यासाठी प्रयत्न केले जातील  विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका या पक्षीय असतात तरी सुध्दा चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आपण ठेवूया  

सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले की, सिमाताई काळुंगे या उच्चशिक्षीत असून फटेवाडीच्या सरपंच पदाचा त्यांना सन्मान लाभला आहे  गावचे विकासासाठी त्यांचा निश्चितच फायदा होईल  याशिवाय रोहन परिचारक, प्रणव परिचारक यांनीही निवडणुक बिनविरोध केलेबद्दल फटेवाडी ग्रामस्थांचे आभार मानले व तालुक्यातील निवडणुका समविचारीच्या माध्यमातून लढविणेच्या कल्पनेला दुजोरा दिला  सत्कार समारंभ प्रसंगी पक्षनेते अजित जगताप, राष्ट्रवादीचे लतीफ तांबोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले  

दै पुण्यनगरीचे पत्रकार श्री संभाजी नागणे यांना झेप परिवाराचा  उत्क्रष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळालेबध्दल तर त्रिमूर्ती टेलर्स चे श्री  दत्तात्रय फटे व राॅयल मस्तानीचे श्री  समाधान चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे हस्ते शाॅल,फेटा व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करणेत आला  

यावेळी मंगळवेढाचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, जकरायाचे एम डी सचिन जाधव, कन्हैया हजारे, प्रभाकर कलुबमे, सुनिल डोके, सुनिल पाटील प्रशांत चव्हाण, जनार्दन कोंडूभैरी, बाळासाहेब चव्हाण, रविंद्र पुजारी, सिध्देश्वर कोकरे, पप्पू स्वामी, ॲड किरण पडवळे, दिनेश लुगडे यांचेसह फटेवाडी येथील किसन फटे, सिद्राम शिंदे, दगडू फटे, संभाजी इंगोले, संदीप इंगोले, शिवाजी आवताडे, भिमराव चव्हाण, संजय फटे, दिगंबर शिंदे, यांचेसह धनश्री परिवाराचे सदस्य व फटेवाडी ग्रामस्थ, महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते  

नुतन सरपंच सौ सिमा प्रकाश काळुंगे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहून कामकाज करेन असा विश्वास व्यक्त केला व सर्व उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रमाचे यजमान श्री प्रकाश काळुंगे यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कारांचे योग्य नियोजन व स्नेहभोजनाचे नेटके व्यवस्थापन केलेबद्दल उपस्थित नागरीकांनी आनंद व्यक्त केला  

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !