सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सुखदुःखात सहभाग घेणारे नेते म्हणजे मारोतराव पाटिल कवळे गुरूजी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरूजी हे अभिमानाने आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत असतात .एक सच्चा प्रामाणिक ,इमानदार निष्कलांकित उद्योग व्यवसायातुन ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेली विकासाची दृष्टी असलेले नायगाव विधानसभा मतदार संघातील क्षेत्राची विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे कवळे गूरूजी. सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सुखदुःखात सहभाग घेणारे तसेच नेहमी साठी एक स्वतंत्र विचारसरणी मांडणारे आम्हा कार्यकर्त्यांचे नेते म्हणजे गुरूजी उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजीचे होय.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही सतापिपासू व संधीसाधू लोक कार्य करत असल्याचा खोटाआव आणत आम्ही च भावी पुढचे असे म्हणत जनतेच्या डोळ्यासमोर धुळफेक होय. सत्ता हातात नसताना सतत आणि अविरत जनतेचे काम करणारे एकमेव नेते म्हणजे कवळे गुरूजी आहेत जनसेवेसाठी त्यांनी आजपर्यंत करत आलेल्या कार्याचा आढावा, मूल्यमापन केले तर डोळ्यासमोर एक प्रदीर्घ काळ उभा राहतो. मुळातच कसलेही राजकीय वारसा नसलेले परंतु राजकीय मुत्सद्दी बाना अंगात असल्यामुळे अगदी येथे प्रतिकूल परिस्थितीत उभे करून कार्यकर्ते जमवून बिलोली देगलुर विधानसभा क्षेत्रातील आरळी सर्कल मध्ये जास्तीचे मतदान निवडणुकांमध्ये त्यांनी काॅग्रेस पक्षाला मिळवून दिली हे कोणालाही नाकारता येणार नाही.
दुष्काळ सदृश्य स्थिती आणि पावसाळ्याच्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुसकान झाले तेव्हा आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कवळे गुरूजी यांनी केले. पूरपडी असो की गारपडी फळबागेचे, सोयाबीन आधी पिकाचे पंचनामे संबंधीत शासनाला धारेवर धरुन काम केले.
अगदी कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये गावोगाव भेटी गाठी करुन जनतेला धिर देण्याचे काम कवळे गुरूजीने केले.ऐवढेच नाहीतर आरोग्य यंत्रणेला आणि तहसील कार्यालयाला वेळोवेळी संपर्क करून लोकांना मदत करून दिली. विविध माध्यमातून जनजागृती करून अनेक आव्हाने त्यांनी जनतेला ह्या काळात केली, सोशल डिस्टंसिंग पासून ते स्वच्छते पर्यंत ,अगदी लोकांना फोन करून भेटून धीर दिला गरजू लोकांना सरकारी दवाखान्याची मदत मिळवून दिली हे कार्य अविस्मरणीय आहे.गेल्या तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शेतीमालाला रास्त भाव मिळावा ,दुधाला भाव मिळावा, भाजीपाला टोमॅटो कांदा रास्त भावाने विकावा ,वीज बिल माफ करावे यासह तरुण युवकांच्या भावने नुसार मतदार संघातील तालुका मोठे जनआंदोलन उभे करून अनेक संघर्षाला सामोरे गेले.
गावोगाव निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायट्यांच्या चेअरमन व व्हायचेअरमन व सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर थाप देऊन ग्रामीण विकासात ग्रामपंचायत चे काय महत्व असते याचे मार्गदर्शन केले जात असून गाव पुढाऱ्यांनी मिळालेल्या संधी तुन अधिकारातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास करावा ग्रामपंचायत हेच ग्रामविकासाचे सत्ताकेंद्र असल्याचे सांगून ग्रामीण विकास करण्याबाबत आव्हान करत आहेत. असे भरीव कार्य आम्हा कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे .म्हणून ग्रामीण भागात आणि कार्यकर्त्यांमध्ये कवळे गुरूजीचे नाव लौकिक कायम आहे म्हणून ग्रामीण भागाच्या विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे कवळे गुरूजी हे अभिमानाने सांगावे वाटते अशा या नेत्याचे दैनिक सकाळ ऑग्रोवन पेपरने काम पाहुन कवळे गुरूजीना सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार पुणे येथे प्रधान करण्यात आला हे एक नांदेड जिल्हाचे भुषण आहे गुरूजी तुमच्या महान कार्याला माझा सलाम.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा