शिवराज पाटील होटाळकराचा वाढदिवस सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाने साजरा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कार्यकर्त्याने काम करीत राहावं पक्षश्रेष्ठीं आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला मोठं केल्या शिवाय राहत नाही त्यामुळे शिवराज पाटील यांनी आगोदर कामदार होऊन नेहमी प्रमाणे काम करा आपल्या नाहीतर कै डी.बी.पाटील यांची इच्छा पूर्ण करण्या साठी मी आपल्या माघे मोठा भाऊ म्हणून खंबीर पणे उभा राहणारच असे वचन देत खा प्रताप पाटील चिखलीकर यांनी होटाळकराना अभिष्टचिंतन सोहळ्यात मनातील इच्छा पूर्ण करण्याचे अभिवचन दिले.
दि.8 जानेवारी रोजी होटाळकर यांचा वाढदिवसा निमित्त मिलिनीयम इंग्लिश स्कुल पटांगणावर भव्य अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी पार पडला.या कार्यक्रमात खा.चिखलीकर हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी उदघाटक म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष वेंकटराव पाटील गोजेगावकर हे होते.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेसाहेब देशमुख बीड ,राहुल सोनवणे , राजेश कुंटुरकर,बालाजी बचेवार,माधव आण्णा साठे,लक्ष्मण ठकरवाड,श्रावण पाटील भिलवंडे,माणिक लोहगावे,रवीआणा पोतंगटीवार,सुधाकर देशमुख,कोंडीबा शिंदे,श्रीनिवास पाटील,किशोर पाटील लघळूदकर,दिलीप धर्माधिकारी,पांडुरंग शिंदे,भगवान लंगडापुरे ,शंकर कल्याण,गोविद पा शिंदीकर, प्रल्हाद उमाटे, राजू पाटील,धनराज शिरोळे, या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवराज पा.होटाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यात भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले.दि.5 जानेवारी पासूनच या वाढदिवस सोहळ्यातील कार्यक्रमाची सुरुवात झाली वाहतुक सुरक्षा मार्गदर्शन,सामान्य ज्ञान स्पर्धा ,दि.6 व 7 जानेवारी रोजी दररोज सायंकाळी 5 ते 10.पर्यंत शालेय बालमहोस्तव घेण्यात आला
दि.8 जानेवारी रोजी सकाळी नरसी होटाळा शिवेवरील महादेव मंदिर येथे अभिषेक नंतर होटाळा, कंडाळा येथे स्वागत,नरसी येथे बालाजी मंदिर व साईबाबा मंदिर नायगाव येथे महाआरती नंतर महा रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते झाले,या वेळी माजी आ.सुभाष साबणे, डॉ चिकणेकर साहेब, बालाजी बचेवार, लक्ष्मण ठकरवाड ,गोपाळ पाटील शिंदे,रुपेश कुंटुरकर,दत्तू पा.होटाळकर यांच्या उपस्थितीत व शिवराज पा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या शिबिरात 360 रक्त दात्यांनी रक्त दान केले
दुपारी 1ते सायंकाळी 5 वा पर्यंत मिलिनीयम स्कुल पटांगण येथे होटाळकराना शुभेच्छा देण्या साठी नायगाव धर्माबाद,उमरी तालुक्यासह इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील मान्यवर व कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. गौरव शिवराजाचा व जागर लोकसंस्कृतीचा हा चित्रपट कलावन्त सोनाली पाटील,मिरा जोशी,एशवर्या बडदे,,सुप्रसिद्ध गायिकाअक्षदा सावंत,गायक निवेदक अमित काकडे,विनोदी कलावन्त बालाजी सुळ,यांच्या सह आरती दीक्षित यांचा आर्केस्ट्रा यांनी एका पेक्षा एक बहारदार गाणी व नृत्य सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.
कार्यक्रमात महेश पवार निर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर मनोगत शिवराज पाटील,राजेसाहेब देशमुख,वेंकट पा गोजेगावकर,यांनी मांडले, संचलन बाळासाहेब पांडे यांनी, प्रास्ताविक गंगाजी पाटील मुगावकर यांनी केले.कार्यक्रम यशस्विते साठी मित्रमंडळाचे पदाधिकारी गणेश पवार,राहुल पाटील नकाते,कुमुद पटेल,दता पाटील इजतगावकर,दिलीप पांढरे,सुरेश कदम,मनु हिवराळे,सचिन बेद्रीकर,शिवा पा गडगेकर,शिवाजी पवार,बाबासाहेब हबर्डे,हरीचंद चव्हाण,गंगाधर कल्याण,गोविंद शिंदे,गणेश भद्रे,भगवान भद्रे,बापूराव पवार,विलास धुपेकर ,विकास पवार,किरण पवार,राजू बावणे,महेश शिंदे,संजय पा.शिंदे,गणेश शिंदे,बालाजी नारे,प्रदीप देमेवार,सय्यद भाई,शिवाजी सवखेडकर,मरवाळीकर,जी.शिंदे,या सह सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा