कुंटूर येथील डांबरी रस्त्याची झाली दुरावस्था
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे . कुंटूर गावापासून ईकळीमाळ फाट्या पर्यंत दोन किलोमीटर अंतर्गत रस्ता गिटी उकळुन पडली आहे. गिटी उकळून मोठमोठे खड्डे पडले आहेत . त्याच रस्त्यावरून नागरिक चालताना मोठे कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभाग कोणीही लक्ष देत नसल्याने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून अपघात होत आहेत. अशी माहिती नागरिकांनी व हानधारकांनी दिली असून लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ही नागरिकांनी केली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा