तीस हंगामातले सर्वोच्च दैनंदिन उत्पादन
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा
कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी एका दिवसात ५३०० क्विंटल साखर उत्पादनाचा उच्चांक केला आहे यापूर्वी दामाजी साखर कारखान्यामध्ये दि १४ मार्च २०१२ या दिवशी ५२५० क्विंटल साखरेचे एका दिवसात उत्पादन झाले होते संत दामाजी साखर कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या ३० गाळप हंगामामधील हा विक्रम असल्याचे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, पांडूरंग साखर कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांत परिचारक मालक, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री भगिरथदादा भालके यांचे मार्गदर्शनाखाली तसेच धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा श्री शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा, जिजामाता पतसंस्थेचे प्रमुख श्री रामकृष्ण नागणे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख, ॲड श्री नंदकुमार पवार, कारखान्याचे माजी व्हा चेअरमन श्री रामचंद्र वाकडे, माजी संचालक श्री यादाप्पा माळी आदिंच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या चालू आहे. संत दामाजी कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर अडचणीच्या काळात दामाजी कारखान्याची सुत्रे या संचालक मंडळाने हाती घेतली.
गळीत हंगाम चालू करणेस वेळ कमी होता तरीही ऑफ सिझनमधील कामे कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी खरात व संचालक मंडळाचे सहकार्याने वेळेत पूर्ण करुन कारखाना गाळपासाठी सज्ज केला. तोडणी वाहतूक यंत्रणा शेवटच्या पंधरा दिवसात भरली. गळीत हंगाम २०२२-२३ चालू झालेपासून शेतकऱ्यांची ऊस बिले, तोडणी वाहतूक बिले, कामगारांच्या पगारी वेळेवर या संचालक मंडळाने केलेल्या आहेत.
कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता २५०० मे टन प्रति दिन असताना दररोज सरासरी ३७०० ते ३८०० मे टन गाळप होत आहे दामाजी कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा ११-१२ टक्के आहे. सरासरी उतारा १० १५ टक्के असून हा उतारा जिल्ह्यामध्ये दुस-या क्रमांकाचा आहे संचालक मंडळाने ठरविलेले गळीताचे उद्षि्ठ आपणां सर्वांच्या सहकार्यामुळे निश्चीतच पार पडेल सभासद-शेतकऱ्यांचा दामाजी कारखान्यावर असणारा विश्वास, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, कारखान्याच्या प्रति निष्ठा असणारे कारखान्याचे अधिकारी व कामगार वर्ग यांच्यामुळेच एका दिवसांमध्ये ५३०० क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असल्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील म्हणाले. तसेच कामगारांच्या या योगदानामुळे सर्व कामगार अभिनंदनास पात्र असल्याचे शेवटी ते म्हणाले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी खरात, संचालक सर्वश्री प्रकाश पाटील सर, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी, चिप इंजिनियर श्री धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट श्री रमेश जायभाय, तसेच इतर खातेप्रमुख-विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा