" कै.दुर्गादास सराफ " उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव चे भुमिपुत्र तथा दैनिक गाववालाचे तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार माधव पा. चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा महत्त्वाचा " कै.दुर्गादास सराफ " उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला त्यामुळे माधव पाटील चव्हाण यांचे मिलिंद बच्छाव यांच्या स्वराज मल्टिसर्व्हीस येथे शिवाजी कुंटूरकर युवा सेना तालुका प्रमुख यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
नुकतेच कंधार येथे घोषित झालेल्या " कै.दुर्गादास सराफ " उत्कृष्ट पुरस्काराबद्दल माधव पाटील चव्हाण यांचं दलित कैवरीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ हणमंते, पत्रकार संघाचे तालुका कार्यध्यक्ष माधव धडेकर , भगवान दादा भद्रे ,रघुनाथ दादा सोनकांबळे ,नागनाथ बेंद्रीकर ,मिलिंद बच्छाव , माजी सरपंच शिवराज वारंवटे, शंकर शिंदे अंतरगावकर, आदींच्या हस्ते नायगाव येथील स्वराज मल्टिसर्व्हीस येथे पुरस्कारप्राप्त झालेले माधव पा.चव्हाण यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. असून त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा