३८६ अंमलदारांना मिळणार बदली, होणार १९८ जनांच्या मुलाखती
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( प्रतीक सोनपसारे )
बुलढाणा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या बदल्यांसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी बदली दरबार घेतला. पण, तेवढ्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत 'स्टे' दिला. यामुळे बदलीपात्र पोलिसांचा अपेक्षाभंग झाला. तेव्हा पासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या अंमलदारांची प्रतिक्षा आता संपली आहे. एकुन ३८६ पोलीस अंमलदार प्रशासकीस बदलीस पात्र असुन उद्या २३ जानेवारी १९८ जणांच्या मुलाखती होणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेडकॉन्स्टेबल, नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
बुलडाणा पोलीस दलातील बदलीपात्र अंमलदारांकडून बदल्यांचे अर्ज मागविण्यात आले. सोबतच अंमलदारांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी कर्तव्य बजावता यावे, कुटुंबासोबत राहता यावे, म्हणून त्यांच्याकडून पसंतीचे ठिकाणेही मागविण्यात आली होती. २४ ते २७ मे २०२२ दरम्यान तत्कालीन पोलीस अधिक्षकांनी बुलढाणा पोलीस आस्थापना मंडळाची बैठकही घेतली. मात्र, पण, तेवढ्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे बदलीपात्र पोलिसांचा अपेक्षाभंग झाला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीसांनी सत्ता काबीज केली. तेव्हापासून बदली होईल, उद्या आज होईल, अशी प्रतिक्षा पोलीस अंमलदारांना लागुन होती.
दरम्यान, पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचा मुहूर्त काढल्याने त्यांची बदलीची प्रतिक्षा संपली आहे. आज २३ जानेवारी रोजी प्रशासकीय बदलीस पात्र पोलीस अंमलदारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असुन पहिल्याच दिवसी १९८ जणांच्या मुलाखती होणार आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेडकॉन्स्टेबल, नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. तर २४ जानेवारी रोजी १८८ पोलीस शिपायांचा मुलाखती होणार असल्याची माहीती आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा