शेतकऱ्यांच्या सोयीच्या बँका आणि पतसंस्थांमध्ये ऊसबिलाची रक्कम जमा
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे )
संत दामाजी साखर कारखान्याच्या हंगाम २०२२-२३ करिता गळीतास आलेल्या ऊसाचे दिनांक १/१२/२०२२ ते १५/१२/२०२२ पर्यंतचे ॲडव्हान्स ऊसबिल रुपये २३००/- प्रमाणे सभासद-शेतक-यांचे मागणीप्रमाणे व त्यांचे सोयीनुसार संबंधीत बँकांमध्ये वर्ग केले असुन कारखान्याचे शेती विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेली ऊस बिलाची पावती (व्हावचर) घेवुन आपले ऊसबिलाची रक्कम बँकेतुन घ्यावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी केले आहे
धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा व त्यांचे विविध शाखामध्ये कार्यक्षेत्रातील व गेटकेन ऊसाचे बिल, जिजामाता महिला नागरी बि शेती सह पतसंस्था, रतनचंद शहा सह बँक,मंगळवेढा, बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा मंगळवेढा इत्यादी बँका/पतसंस्था मध्ये पंधरवाडयाचे बिल रुपये १२,०३,३९,६३३/- संबंधीत शेतकऱ्यांचे मागणीनुसार खात्यावर वर्ग केले आहेत तसेच ३१ डिसेंबर २०२२ अखेरचे तोडणी वाहतूक बिलही ठेकेदारांचे मागणीनुसार बँका/पतसंस्था मधील खात्यावर वर्ग केल्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी सांगीतले
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन श्री तानाजी खरात, सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा