एक लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त मंगळवेढा पोलिसांची चमकदार कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (राज सारवडे)
दिनांक ०३/०८/२०२२ रोजी जमादार महिबुब उंब्रजकर रा. हुलजंती हे त्याच्या राहत्या घराला कुलूप लावून हुलजंती येथे आठवडा बाजार करण्याकरीता गेले असता त्याच्या बंद घरात दुपारी १२ /०० ते ०२/०० चे दरम्यान चोरांनी येवून त्याचे बंद घराचे कुलूप तोडून घरामधील कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने हे चोरून नेल्याबाबतची तक्रार मंगळवेढा पोलीस ठाण्यास येवून दिलेली होती.
सदर झालेल्या चोरीबाबत मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं. १८१ / २०२२ भा.दं.वि. कलम ३८०, ४५४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोसई धापटे, पोहेकॉ हेंबाडे, पोहेकॉ येलपले, पोना मोरे, पोकों / २१३८ मिसाळ असे तपास पथक तयार करून सदर गुन्हयातील आरोपी विजय छबू काळे वय २३ वर्षे रा. फोडशिरस ता. माळशिरस जि.सोलापूर शोध घेवून त्यास सदर गुन्हयात अटक केली होती. आरोपी कडे गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदर आरोपीतांनी मंगळवेढा पोलीस ठाणे कडील दाखल असलेल्या गुन्हयातील फिर्यादी मसा धोंडिबा साखरे वय ४५ वर्षे रा. उचेठाण ता. मंगळवेढा तसेच फिर्यादी शारदा उत्तम कोपे वय ४० वर्षे रा. भोसे ता. मंगळवेढा जि.सोलापूर यांच्या बंद घरात भरदिवसा दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे कबूली दिलेली आहे.
आरोपी विजय छबू काळे याने त्याचे साथीदाराच्या मदतीने मंगळवेढयामधील मौजे हुलजंती, उचेठाण व भोसे या ठिकाणी भरदिवसा बंद घराचे कडी कॉयडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले खालील वर्णनाचे व किंमतीचे दागिने चोरून नेले आहे. त्यामध्ये २५,००० /- रू किंमतीचे अर्धा तोळयाची बोरमाळ, २०,००० /- रु. किंमतीचे एक चार ग्रॅम वजनाची ठुशी, ७५,०००/- रु. किमतीचे एकूण १५ ग्रॅम वजनाच्या एकूण ०३ पिळयाच्या अंगठ्या ५०,००० /- रु. किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे वेल, झुमके व डोरले (सर्व किंमती अंदाजे असून धातूचा खारेपणा व अचूक किंमती बाबत तपासणी सुरू आहे) असा एकूण १,७०,०००/- रुपये किंमतचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कामगिरी ही मा. शिरीष सरदेशपांडे सो, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिम्मतराव जाधव सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील मॅडम मंगळवेढा विभाग मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखाली मा.रणजीत माने सो, व त्याचे पथकातील पोसई पुरुषोत्तम धापटे, पोहेकॉ / दयानंद हेंबाडे, पोहेकॉ / दत्ता येलपले, पोना / सुनिल मोरे, पोकॉ/ अजित मिसाळ याचे सह सदरची कामगिरी केलेली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा