द.ह. कवठेकर प्रशालेने राखली उज्वल यशाची परंपरा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम गुणवत्ता यादी निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत द. ह. कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. प्रशालेतील एकूण 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झाले आहेत.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेत अयुष समाधान बनसोडे (राज्यात नववा )280/300, उत्कर्ष शिवलिंग गांजकर (तालुक्यात 3.रा) 260/300, जय योगेश अनेराव 256/300, हृषिकेश धोंडीराम तांदळे 254/300, मिताली महेश हवळ 240/300, अर्णव माणिक मासाळ 228/300, गुरुराज गौरीहर उखळे 224/300, साईश शैलेश वांगीकर 218/300 हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत चिन्मय महेश कुलकर्णी(226/300), संस्कार अशोक अवताडे (224/300), सार्थक वैभव शिंदे (228/300), मानव माणिक मासाळ (238/300) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रशालेतील शिक्षक श्री एस. आर. गवळी सर, सौ.सोलापूर मॅडम, सौ.गायकवाड मॅडम,सौ.विष्णू मॅडम, श्री.समीर दिवाण सर, श्री.आर. डी. जाधव सर, श्री.वैभव वेळापुरे सर यांनी केले आहे. प्रशालेच्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. कुलकर्णी सर, उप मुख्याध्यापक श्री. आर. जी. केसकर सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. एम. आर. मुंढे सर, सौ. एस. आर. कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या पाल्याला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून शाळेचे आभार मानले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा