व्यापारी कमेटी पंढरपूर च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा.

माजी नगरसेवक परदेशी विवेक परदेशी यांच्या शुभहस्ते झाले ध्वजवंदन

Celebrating Republic Day, Trade Committee, Pandharpur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

          व्यापारी कमेटी पंढरपूर च्या वतीने गुरुवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ध्यजवंधनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक परदेशी ऑईल मिल चे प्रमुख विवेक परदेशी यांच्या शुभहस्ते तसेच व्यापारी कमेटीचे चेअरमन सतीश लिगाडे, अध्यक्ष महावीर फडे, होमगार्ड प्रमुख परचंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. सदर राष्ट्रीय कार्यक्रमात ध्वजनी म्हणून सतीश मोहिते यांनी काम पाहिले. 

भारतीय स्वातंत्र्याचे प्रथम झेंडावंदन १५ ऑगस्ट १९४७ रोजी व्यापारी कमेटी पंढरपूर च्या वतीने साजरा करण्यात आला होता.सदर प्रसंगी कै. बसलिंग ज. बुरजे यांच्या शुभ हस्ते ध्वज उभा केला होता तेव्हापासून आजपरियंत याच ठिकाणी स्वतंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. आज रोजी याच ठिकाणी झेंडा चौक येथे भारतीय प्रजासत्ताक दिना दिन दिनाचा ७३ वा वर्धापन दिन व्यापारी कमेटी च्या वतीने साजरा करण्यात आला.

          सदर प्रसंगी सेक्रेटरी विश्वेश्वर भिंगे, पदमकुमार गांधी, प्रकाश कुलकर्णी, गजकुमार चंकेश्वरा, सोमनाथ डोंबे, मुकुंद मर्दा, नागनाथ लिगाडे, प्रदीप घोंगडे, किरणकुमार गांधी, कांतीलाल सुपेकर, विजयकुमार परदेशी, संजय भिंगे, सचिन म्हमाने, राहुल म्हमाने, ज्ञानेश्वर चव्हाण, भगीरत म्हमाने, प्रवीण कोलवार, सुधीर कोलवार, स्वप्निल फडे, भाऊसाहेब शेटे, प्रकाश शेटे, दिपक शेटे,श्री माळवतकर, प्रदीप फडे, श्री पावले, अमरनाथ परदेशी,सोमनाथ जवळे,संजय जवंजाळ,श्री चव्हाण, श्री कटकमवार, सुमित गडम, विकी कटकवार, वसंतराव परचंडे, अविनाश रणदिवे ,श्री गांडुळे, श्री झेंड, महादेव परचंडे व होमगार्ड प्रतिनिधी, महिला होमगार्ड प्रतिनिधी व नागरिक आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !