पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वूभुमीवर निवड
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाचे सचिव श्री संजय मोरे यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचे विश्वासू असलेले दुसरबीड गावचे गेली 10 वर्ष उपसरपंच पद भूषविलेले श्री वैभव देशमुख सर यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक कुशल संघटक तालुक्याच्या राजकारणात अग्रेसर असलेले नाव तसेच डॉ. शशिकांत खेडेकर यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे आता पक्षाने त्यांच्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी सोपवलेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप- सेना युतीला याचा नक्कीच फायदा होण्याची शक्यता नक्कीच नाकारता येणार नाही अशी चर्चा देखील तालुक्यात रंगली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा