वाढदिवसानिमित्त चाहत्याकडून पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कोणत्याही पोलीस ठाण्यात अनेक पोलीस अधिकारी येतात कालांतरानंतर बदली होऊन जातात परंतु आपल्या कार्यकर्तृत्वातून ज्यांनी आपली एक आगळीवेगळी ओळख करून सर्वांचे चाहते असलेले कुंटूर पोलीस ठाण्याचे कार्यरत सपोनी महादेव पुरी यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कित्येक चाहत्याकडून त्यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
सपोनी महादेव पुरी यांनी या अगोदर रामतीर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत या कालावधीत त्यांची आपल्या कार्यकर्तृत्वातून सर्वांना ओळख झाली एवढे विशेष असताना दिनांक 29 जानेवारी हा त्यांचा वाढदिवसाची तारीख असल्याने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षावाचा पाऊस पडत होता तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक चाहत्या वर्गाकडून महादेवपुरी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
नायगाव येथे पत्रकार बांधवाकडून सत्कार करण्यात आलेल्या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार माधव पाटील चव्हाण, पत्रकार प्रकाश हनुमंते, शेख आरिफ, गंगाधर कोतेवार, अंकुश देगावकर आदिजनाची उपस्थिती होती तर कुंटूर पोलीस ठाण्यात महादेव पुरी यांचा सत्कार करण्यात आलेल्या वेळी पत्रकार माधव बैलकवाड, पत्रकार शिवाजी कुंटूरकर, मानवहित लोकशाही पक्षाचे नायगाव तालुका प्रमुख पूनम भाऊ धमणवाडे यासह चंद्रकांत फुगारे, देशपांडे, विनोद इबितदार ,रतिष इबितदार व आदी जणांनी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा