अस्वच्छतेने गाठला कळस, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोणत्या सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून गेल्या काही दिवसांपासून नाले सफाईचे काम सुद्धा झाले नाही . तसेच मागासवर्गीय दलित वस्ती मधील काम रखडल्या मुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावातील रस्त्यावर गवत फुटल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे परिणामी जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावातील मुख्य मार्गावरील नालीचे पाणी रस्त्यावर येत असून रस्त्यावर झाडे फुटले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्य व जीवाची काळजी ग्रामपंचायतला नसून सदर ग्रामसेवक मॅडम हे जिल्ह्याचे ठिकाणी राहून दिवाळी सण साजरा करत असून सरपंच हे तालुक्याच्या ठिकाणी राहतात त्यामुळे गावातील नागरिकांना मच्छर व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गावातील नाले सफाई नाही,पाणी वेळेवर मिळत नसल्याचेही ओरड सुरू असून याकडे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची ओरड नागरिक करत आहेत.
सद्यस्थितीला दिवाळीचा मोठा सण असून मच्छर प्रादुर्भाव वाढल्याने कित्येक वर्षापासून फवारणी केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ग्रामसेविका मॅडम व सरपंच यांचे रुई खुर्द गावाकडे दुर्लक्ष झाले असून गावाला वाली कोण अशी परिस्थिती नागरिकांतून बोलल्या जात आहे. कित्येक वर्षापासून दलित वस्तीचे कामे झाले नाही रस्त्यावर गवत फुटलं असुन साप,विंचु चावणयची भिती नागरिकांना होत आहे.
त्यामुळे नाले रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय व मच्छर प्रादुर्भाव सर्व त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून वरिष्ठ अधिकारी व तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी तसेच ही सीईओ मॅडम या गावाची पाहणी करून सदर जिल्ह्याचे ठिकाणी घर भाडे घेऊन ग्राम सेविका मॅडम राहतात त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा