समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर यांचा सन्मान
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील महालक्ष्मी महिला बचत गटांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
गटातील महिलांनी सर्व महिला सदस्य यांना वान देऊन हळदी कुंकू तीळगुळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महालक्ष्मी महिला बचत गटांच्या अध्यक्ष माळसाबाई वडे सचिव गंगाबाई महादळे सदस्य संगिता आमबटवाड, कलावती देवदे, अंजनाबाई देवदे, रुकमीनबाई देवघरे, चौत्राबाई संभोड, संगीताताई महादळे, आदी महिला उपस्थित होत्या. महालक्ष्मी महिला बचत गट हा मेंढीचा केसांपासून घोंगडी विणकाम करतं असतं. सदर महाराष्ट्र राज्यत विविध मेळाव्यामध्ये घोंगडी आकर्षक ठरली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा