सरपंच झाल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना कळमनुरी तालुक्यातून समोर आली आहे. अनुसूचित जातीमधील चांभार जातीचा युवक सरपंच कसा काय झाला ? चंभार्डे माजलेत साले ! असे म्हणत जातीयवादी भावनेतून चांभार जातीच्या युवकावर बोल्डा येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला, याचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र माधवराव गायकवाड साहेब यांच्यावतीने जाहिर निषेध नोंदविण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत अनुसूचित जातीतील चांभार जातीचे किशन वामनराव विणकर यांचे पॅनल बहुमताने निवडून आले व ते स्वतः सरपंच झाले. ही बाब गावातील कांही जातीयवादी लोकांना सहन झाली नाही म्हणून त्यांनी शनिवार दि. ६ जानेवारी २०२३ रोजी गणेश दत्तराव विणकर (वय २३) या युवकावर लाठ्या काठ्या, चाकू व कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. तो मेला असे समजून गावाबाहेरील नालीत फेकून दिले.
या बाबत माहिती मिळताच सरपंच आणि नातेवाईकांनी गणेश विणकर यास आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे नेले असता त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. बाळापूर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यानी पुढील उपचारासाठी विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा