उपस्थितांकडू श्री संत रोहिदास महाराजांचे पूजन
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा. ( विष्णू मुंगसे )
बालाजी देडगाव - नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील श्री संत रोहिदास महाराज सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बन्सीभाऊ एडके यांनी आपल्या प्रास्ताविकातून श्री संत रोहिदास महाराजांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला.
यावेळी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती कारभारी चेडे, बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी चेअरमन भानुदास मुंगसे, सेवा संस्थेचे सचिव रामकिसन तांबे, भाऊसाहेब मुंगसे, रामभाऊ मुंगसे, पांडुरंग रक्ताटे, संजय मुंगसे (टेलर), तुळशीराम तांबे, संजय मुंगसे, संभाजी कुटे, विकास तांबे, भैय्या पठाण, उत्तम तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले. तर आभार ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी मानले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा