maharashtra day, workers day, shivshahi news,

धुळ्याकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या बसचा अपघात - २० प्रवासी जखमी - त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक

समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

bus accident, 20 passengers injured, dule, chalisgaon, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड, औरंगाबाद ( मिलिंदकुमार लांडगे )

धुळे :- सकाळी धुळ्यात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही चाळीसगाव येथून प्रवाशांना घेऊन अक्कलकुवाकडे निघाली होती. 

सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बस धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ आली, त्यात सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विद्यार्थी आणि प्रवाश्यांना घेऊन ही बस धुळ्याकडे रवाना झाली. तरवडे गाव सोडून 2 किलोमीटर अंतरावर धुळ्याकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने बसला हुलकावणी दिली. यावेळी बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे.

bus accident, 20 passengers injured, dule, chalisgaon, shivshahi news,

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !