राष्ट्रीय व राज्य अध्यक्षांसह अनेक नेत्यांची उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, (शिवाजी कुंटूरकर)
चिपळूण : दिनांक २डिसेंबर
अखिल भारतीय धोबी महासंघ , महाराष्ट्र परिट ( धोबी ) सेवा मंडळाच्या कोकण विभागिय मंडळ नं .१ रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिट समाज बांधव व भगिनींचा पहिला स्नेह मेळावा रविवार दि .४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कोकणचे नेते , महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथील पेठमाप परिद आळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर , संत गागडगेबाबा व्यासपीठ येथे आयोजित करण्यात आला आहे .
यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकांत कनोजिया , अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरीष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे , महाराष्ट्र परिट ( धोबी ) सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रशेठ खेरणार , अखिल भारतीय धोबी महासंघाचे नेते राजेंद्रशेठ आहेर , आरक्षण समितीचे अध्यक्ष आशिषभाऊ कदम महाराष्ट्र परिट ( धोबी ) सेवा मंडळाचे सुकाणू समीतीचे माजी अध्यक्ष किसनराव जोर्वेकर , महाराष्ट्र परिट ( धोबी ) सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संतोषभाऊ भालेकर , युवक अध्यक्ष रविभाऊ राऊत , संघटक सुरेशनाना नाशिककर , आरक्षण समितीचे सदस्य सुधीरभाऊ खेरणार अ.भा.धोबी महासंघाचे नेते बळवंतराव साळुंखे , कोकणचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संत गाडगबाबा परिट समाज संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताराम ( आबा ) महाडीक ज्येष्ठ मार्गदर्शक श्री . राजाराम महाडीक , महाराष्ट्र परिट ( धोबी ) सेवा मंडळ महिला प्रदेश अध्यक्षा सौ . समाताई रंधे , महिला प्रदेश कार्याध्यक्षा सुषमाताई अमृतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
दि .४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ९ चहा व नाष्टा , ९ ते १० पेठमाप भागातून शोभायात्रा , १० ते ११ नृत्यकला व हळदीकुंकू समारंभ , ११ ते २ संत गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन , स्वागत गीत , मान्यवरांचे स्वागत व अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रम समाजभूषण पुरस्कार कोकणचे नेते , महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष शांतारामभाऊ कदम व महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष व संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरीचे कार्याध्यक्ष , पत्रकार श्री . सुभाष कदम , सेवानिवृत्त शिक्षक व सिंधुदुर्ग समाजाचे नेते कृष्णा दळवी या शिवाय आदर्श माता पुरस्कार माजी नगराध्यक्षा व जिल्हा सल्लागार सौ . सावित्रीताई होमकळस , आदर्श बाल पुरस्कार ( वक्तृत्व ) कु . मनवा सातारकर यांना दिला जाणार आहे शिवाय शिव , ता . खेड येथील वीरपत्नी श्रीमती सुनंदाताई बाळकृष्ण महाडीक यांचा विशेष सत्कार करण्यात येईल . दुपारी २ ते ४ स्नेहभोजन होईल व कार्यक्रमाची सांगता होईल .
तरी या मेळाव्यास आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मेळावा संयोजन समितीचे सचिव , पत्रकार श्री . सुभाष कदम यांनी केले आहे . या मेळाव्याची तयारी मेळावा संयोजन समितीचे सदस्य व कोकण विभागीय अध्यक्ष नंदकुमार राक्षे , कार्याध्यक्ष अनिल सुर्वे , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक कदम , रायगड अध्यक्ष किशोर वासकर , सिंधुदुर्ग अध्यक्ष दिलीप भालेकर , रायगड युवक अध्यक्ष रविंद्र काणेकर , राज्य सल्लागार हसमुख पांगारकर , उपाध्यक्ष वसंतराव पिंपळकर , जगदिश कदम , अखिल भारतीय धोबी महासंघ सदस्य संतोष शिंदे , रायगड महिला अध्यक्ष भारती जाधव , रत्नागिरी महिलाध्यक्ष प्रिया शिंदे , सिंधुदुर्ग महिलाध्यक्ष दिपाली भालेकर , रतनागिरी युवक अध्यक्ष सुयोग कदम , रत्नागिरी लॉन्ड्री अध्यक्ष महेश भोसले , संत गाडगेबाबा परिट सेवा मंडळ रत्नागिरी अध्यक्ष राजेंद्र नेरकर , विजयराव पाटील , रत्नागिरी जिल्हा सचिव स्वप्नील शिंद , अजित पावसकर , आलोक कदम , संदेश कदम , वैशाली शिंदे , रितेश महाडिक , दुर्गेश्वर रोकडे , राजू भोसले व जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य करीत आहेत .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा