श्री परमपूज्य बालयोगी वेंकट स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
आज दिनांक 18 डिसेंबर रोजी नायगाव शहरांमध्ये वक्रतुंड क्रिटिकल केअर हॉस्पिटल चे भव्य अशी शुभारंभ श्री परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिंपळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी आमदार वसंतरावजी चव्हाण, सेवानिवृत्त न्यायाधीश भीमराज नरवाडे, श्रावण पाटील भिलवंडे, भास्कर पाटील भिलवंडे, माजी सभापती सय्यद रहीम शेठ, रवींद्र पाटील भिलवंडे यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती
तर या वक्रतुंड क्रिटिकल केअर हॉस्पिटल मधिल उपलब्ध सुविधा सुसज्ज व अद्यावत विभाग एक्सरे एसीजी हृदयविकार मधुमेह प्रसूती व जैन रिप्लेसमेंट सुसज्य अंतर्गत विभाग 24 तास तज्ञ डॉक्टर्स अनुभवी ब्रदर व सिस्टर अशा सुविधा असलेल्या वक्रतुंड क्रिटिकल केअर हॉस्पिटल चा शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असून
यावेळी डॉक्टर सत्यनारायण बटारी डॉक्टर सारा खान डॉक्टर बळवंत चव्हाण डॉक्टर बालाजी तुपेकर डॉक्टर चंदू पाटील डॉक्टर प्रशांत शिंदे डॉक्टर मुकुंद ढाणीवाला डॉक्टर गुलाबराव पाटील वडजे यांच्यासह मेडिकल असोसिएशनचे अनिल वेंकटराव पाटील गुजरीकर, डॉक्टर चिकनेकर व धनराज शिरोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर सर्व मान्यवरांचा वक्रतुंड क्रिटिकल केअर हॉस्पिटल चे डॉक्टर सत्यनारायण बटारी MD medicine ( sugar ) यांनी सर्वांचा सन्मान करून सर्वांच मनस्वी आभार मानले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा