देगाव मध्ये पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर तालुकयातील देगावचे प्रतिष्ठित नागरिक सच्चिदानंद उर्फ बाळासाहेब पाटील देगावकर यांचे रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . बाळासाहेब पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे काका होते . देगाव तसेच तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा दबदबा होता .
रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी ११. ३० च्या सुमारास सच्चिदानंद उर्फ बाळासाहेब [आप्पा ]पाटील यांचे निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ४७ वर्षे होते . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून त्यांच्या निधनाने देगावकर पाटील परिवार आणि गावात शोकाकुल वातावरण आहे .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा