संदीप जाधव यांचा संसार उघड्यावर, मित्रांनी केले मदतीचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( मिलिंद कुमार लांडगे )
पिशोर येथील नाका पॉइंटवर साधारणतः २० ते २२ वर्ष आधी होतकरू बेरोजगार तरुण संदीप जाधव यांनी गंगामाई कम्युनिकेशन नावे std दुकान सुरू के ले होते. कन्नड- सिल्लोड दोन्ही रस्त्याला उभे असलेल्या प्रवासी व इतरांसाठी आधार देणारी ही दुकान. २००६ च्या दरम्यान भारत संचार निर्गम द्वारे मोबाईल सेवा देणारा मनोरा (टॉवर) उभा राहून BSNL ची रेंज उपलब्ध झाली. तेव्हा BSNL सिम उपलब्ध सहजा सहजी होत नव्हते. ज्यांना मिळविता आले त्यांनी मिळवून मोाइलद्वारे संवाद सुरू झाले.
परंतु मोबाईल धारकांना फोन वापरणे कठीण जायचे साधी बेल जरी बंद झाली तरी लोक मोबाईल घेऊन संदीप भाऊकडे यायचे व मोबाईल खराब झाला दुरुस्त करून द्या म्हणून विनंती करायचे. परंतु संदीप भाऊ प्रांजळ मनाने निस्वार्थी वृत्तीने सबंधितास मोबाईल बाबत माहिती देऊन समस्या दूर करायचे. पैसे कमवायच्या हेतूने जर काम केले असते तर सुरुवातीच्या काळात बक्कळ पैसा या माणसाला कमावला असता. परंतु मोबाईलचे छोटे मोठे प्रॉब्लेम अत्यल्प दरात सोडवत या माणसाने पैसा न कमावता अनेक माणसे कमावली. साध्या फोनची जागा आता महागड्या फोनने घेतली. छोट्या दुकानांचे मोठे दुकान उदयास येत शोरुम उभे राहिले परंतु संदीप भाऊचे दुकान आहे त्याच ठिकाणी त्याच साध्या रीतीने सुरू होते व सेवाही.
परंतु दिनांक १८ वार रविवार रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान देवधर्म जोपासणाऱ्या या दुकानातून धुराचे कल्लोळ बाहेर पडल्याचे बघताच अनेकांचे मन हेलावले. अनेक किंमती मोबाईलसह साहित्य जळून खाक होत असताना मित्र आप्तेष्टांनी आग आटोक्यात आणली परंतु त्यातून शिल्लक काहीही राहिले नाही.
ज्या दुकानावर संदीप भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी आपली उपजीविका भागवीत होते तेच जळून खाक झाल्याने कुटुंबीय तर हादरलेच परंतु ज्यांनी ज्यांनी संदीप भाऊ ची मदत घेतली होती त्यांच्या डोळ्यात पाणी आपसूकच आले.
परंतु वाईट वाटणे, हळहळ व्यक्त करणे ह्या झाल्या भावना, मानवी मन परंतु याच्याने संदीप भाऊ सह कुटुंबाला एक मानसिक आधार मिळेल काम करण्याची ऊर्जा मिळेलच परंतु अचानक जी अर्थिक पोकळी निर्माण झाली, जे नुकसानीचे भगदाड पडले ते भरून निघणे अशक्य. परंतु तुम्ही आम्ही ठरविल्यास ती उणीव भरून निघणे सोपे होऊ शकते. म्हणून फुल न फुलाची पाकळी का होईना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी ती मदत करून मानवता जोपासावी.
टीप - इच्छुकानी ९६८९२६४५४६ या फोन -पे क्रमांकवर किंवा प्रत्यक्ष मदत करावी.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा