दीपिकाचा बोल्डनेस वाढतोय . बेशरम पणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
पदार्पणापासून नेहमीच भूमिकांची अचूक निवड करत शिखरावर पोहचलेली दीपिका पदुकोण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . ' पठाण ' या चित्रपटामुळे तिला नाना प्रकारच्या वादांना सामोरं जावं लागत आहे . या चित्रपटातील शारुखन खानसोबतच्या ' बेशरम रंग ' या गाण्यात दीपिकानं गाण्यातील शब्दांना न्याय देत ' बेशरम रंग ' उधळल्याची चर्चा सोशल मीडियापासून सर्वच ठिकाणी सुरु आहे . खरं पाहिलं तर शाहरुखला सध्या एका सुपरहिटची नितांत गरज आहे . दीपिकाची गाडी मात्र चांगली सुरु आहे .
मध्यंतरी तिनं हॉलिवूडपटातही काम केले . आगामी ' सर्कस ' मध्ये तिचं ' करंट लगा रे ........ ' हे गाणं गाजत आहे . ' फायटार ' चं शुटिंग सुरु आहे . शारुखच्या ' जवान ' मध्ये ती कॅमिओ करणार आहे . ' प्रोजेक्ट के ' या तेलगू चित्रपटाचंही काम सुरु आहे . त्यामुळे दिपीकाकडे कामाची कमतरता मुळीच नाही . असं असूनही तिने बोल्ड भूमिका आणि इंटिमेट सीन्सचा मार्ग का अवलंबला . हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे . यंदा प्रदर्शित झालेल्या ' गेहराईया ' या चित्रपटातही दीपिकाचा बोल्ड अंदाज रसिकांनी अनुभवाला .
डिजिटली रिलीज झालेल्या या चित्रपटानंतर ' पठाण ' मध्ये आणखी दोन पावलं पुढे टाकत तिनं ' बेशरम रंग ' हे गाण्याचे बोल सार्थ ठरवले आणि त्यासोबत वादालाही आमंत्रण दिलं , पण खरंच याची गरज होती का , हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो . याचं उत्तर कदाचित ' पठाण ' च देईल .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा