उर्वशी म्हणते, कुणालाच माझी परवा नाही
अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत आहे. होय, उर्वशी रौतेलाने एखादी पोस्ट केली रे केली की, नेटकरी त्याचा संबंध थेट क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत जोडतात. तिला ट्रोल करतात. आता तर उर्वशी रिषभला स्टॉक करत असल्याचा आरोपही होताना दिसतोय. आतापर्यंत उर्वशी यावर काहीही बोलली नव्हती; पण आता तिने एक व्हिडिओ शेअर करत, यावर रिअॕक्ट केले आहे. व्हिडिओत उर्वशी साडीत अतिशय खिन्न, उदास चेहऱ्यास उभी दिसतेय. बॅकग्राऊंडमध्ये एक शायरी ऐकायला मिळतेय.
या व्हिडिओला उर्वशी कॅप्शन दिला आहे, त्यात तिने तिच्या भावना व्यक्त करत ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते आधी,' इराणमध्ये महसा अमिनी आणि आता भारतात माझ्यासोबत... मुझे स्टॉक कर म्हणत बुली केल्या जात आहे. कुणालाच माझी परवा नाही . मला सपोर्ट करणारं कोणी नाही. पण एक समक्ष महिला तीच आहे जी खोलवर सगळं सहन करून खूप प्रेम देते. आत्या सोबत तिच्या अश्रूचाही बांध फुटतो. ती कोमल आहे आणि तितकीच सक्षमही आहे. एक महिला जगासाठी भेट आहे.'
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा