पाऊस मोठा असल्याने शोधकार्यात आला अडथळा
शिवशाही वृत्तसेवा, करमाळा
करमाळा गुळसडी रस्त्यावरील पांडव ओढ्यावरील पुलावरून वाहून गेलेल्या मजुराचा मृतदेह दुसऱ्या दिवशी 50 मीटरच्या अंतरावरील झुडपात सापडला. अशोक रामदास जाधव ( रा.नाथापूर ता.जि.बीड ) असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात गुळसडी रस्त्यावरील पांडवाडा ( गाव पांडे हद्द ) वरील पुलावरून जाधव हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ते कामानिमित्त करमाळा तालुक्यातील खंडागळे वस्ती ( गुळसडी ) येथे आले होते. तेथेच माळावर ते पाल टाकून राहत होते.
मंगळवारी मोठा पाऊस झाल्याने आपत्ती व्यवस्थापनास शोधकार्य करण्यास अडचणी येत होत्या. बुधवारी सकाळी शोध कार्य सुरू झाल्यानंतर रस्त्यापासून जवळच एका झाडाजवळ त्यांचा मृतदेह सापडला आहे.
मंगळवारी पाऊस सुरू होण्यापूर्वी कामानिमित्त आलेल्या नागरिकांपैकी मृतदेह सापडलेल्या व्यक्तीसह आणखीन एक जण घराबाहेर पडले होते. त्यानंतर घराकडे परतत असताना जोरदार पाऊस त्यात ओढ्याच्या पाण्यात वाढ झाली. या पाण्याचा अंदाज न आल्याने जाधव वाहून गेले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, हवालदार रंदवे, पोलीस पाटील धनाजी अडसूळ यांच्यासह अनेकांनी शोधा कार्य केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा