भीलवाडा येथे होणार स्पर्धा : सांगोला येथील सराव शिबिरातून झाली निवड
शिवशाही वृत्तसेवा, सांगोला
राजस्थान भीलवाडा येथे 13 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथील सराव शिबिरात महाराष्ट्र संघाची निवड केल्याचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगितले.
गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृतीसमारोह व जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व महा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या मैदानावर 11 ते 15 सप्टेंबर यादरम्यान घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्य पद स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 60 मुला-मुलींचे संघ सहभागी झाले होते. यावेळी संस्था सचिव म. शं घोडके, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, महेश शिंदे ,एम. शेफी, प्रशांत मस्के, डॉक्टर गणेश सपाटे, अय्युब मण्यार, प्राचार्य भीमाशंकर पैलवान, विलास क्षीरसागर, सुनील भोरे, नरेंद्र होनराव , प्रा.डी.के. पाटील, क्रीडा विभाग प्रमुख सुनील मोरे उपस्थित होते.
अंतिम संघातील संभाव्य बारा खेळाडूंची नावेकुमार गट- देव प्रेमी, विदीत पुनामिया व मिलन कुमार-मुंबई उपनगर, शिवराज पटेल-पुणे, यश मेहता-नागपूर, प्रभात मिश्रा -रायगड, ब्रझैन लाखानी-रायगड, यशवर्धन जाधव, सार्थक वाईकर-कोल्हापूर, साहिल धनवटे- बीड, संकल्प लोंढा-औरंगाबाद, ज्योतीर्दित दानवे-सोलापूर, राखीव तन्मय कोकरे-सातारा, प्रशिक्षक जमीर सय्यद-बीड, केदार सुतार-कोल्हापूर, संघ व्यवस्थापक अय्युब मण्यार-सांगोला, तसेच कुमारी गट-मानसी निर्मळकर, भूमिका सर्जे, सिया खिलारे-पुणे, गुंजन मंत्री, स्वाती वानखेडे -नागपूर, रिचा रवी मुंबई उपनगर, पूर्वा भोसले, आदिती पारगावकर-कोल्हापूर, अविष्कार गुरव-सातारा, स्नेहा यादव-रायगड, ऋतुजा नलवडे-मुंबई शहर, समीक्षा पाटील-कोल्हापूर, राखीव खुशी सोळंकी-मुंबई उपनगर, प्रशिक्षक राहुल शिंदे-पुणे, विजय चिसाने-नागपूर, संघ व्यवस्थापक रितू सिंग-पुणे असा संघ असणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा