महिलांनी घेतला गरबा दांडिया खेळण्याचा आनंद
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
लायंस क्लब्स इंटरनेशनल (Lions Clubs International) पंढरपूर व परदेशी बॅटमिंटन अकॅडमी यांच्या वतीने महिलांसाठी विना शुल्क गरबा व दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन लायन्स चे रिजन चेअरमन श्री गहिनीनाथ कदम तसेच लायन्स क्लब चे झोन चेअरमन राजीव कटेकर, बॅडमिंटन कोच श्रीपाद परदेशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी सर्व लायन्स सदस्य उपस्थित होते , पंढरपुर शहरातील महिलांनी सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कार्यक्रम खूप छान झाल्याची प्रतिक्रिया दिली. श्री बंटी राका सर, श्री नारायण उत्पात व कोरिओग्राफर दिव्यानी माढेकर यांनी सर्व स्पर्धकाचे परीक्षण केले. सदर कार्यक्रमात लायन्स स्टार ऑफ द नाईट प्रथम क्रमांक- अमिशा खंडेलवाल आणि जागृती खंडेलवाल, द्वितीय क्र- सिमा गुप्ता आणी माधुरी जाधव, तृतीय क्र- रेशमा परदेशी आणी संजना गुप्ता, चतुर्थ क्र- मिनल मोहीकर आणि शितल रजपूत, पाचवा क्र-डॉ मृणाल गांधी आणि प्रतीक्षा येलपले, उत्तेजनार्थ प्रथम- कृतांजली सावंत आणी आरती पाटील, उत्तेजनार्थ व्दितीय- मानसी जगलपुरे आणी मनाली कोठारी. बेस्ट ड्रेपरी ऑफ द नाईट प्रथम क्रमांक- डॉ अमीशा खंडेलवाल व जागृती खंडेलवाल, व्दितीय क्रंमांक- सिमा गुप्ता व रेशमा परदेशी, तृतीय क्रंमांक- मिनल मोहिकर आदींना देण्यात आले.
पंढरपूर शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र गरबा व दांडीया चे आयोजन करण्या संदर्भात मागणी होत होती यासाठी लायन्स क्लब पंढरपूर ने पुढाकार घेउन महिलांसाठी गरबा, दांडीया उपक्रम राबवला असल्याचे लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले व यापुढे लायन्स क्लब च्या वतीने विविध सांस्कृतिक, कला ,क्रीडा, संस्कृती, सामान्य ज्ञान, शिक्षकांसाठी लायन्स क्वेस्ट असे विवीध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. सदर वर्षा मध्ये लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने खुप चांगले उपक्रम राबवले जात असुन आज महिलांसाठी खूप स्तुत्य कार्यक्रम राबवला असल्याचे रिजन चेअरमन गहिनीनाथ कदम यांनी सांगितले तर या वर्षांमध्ये लायन्स क्लब पंढरपूर कडून असणाऱ्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू असे वचन झोन चेअरमन रा.पा.कटेकर यांनी दिले. कार्यक्रमा नंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
सदर प्रसंगी रिजन सेक्रेटरी ला.अँड विकास जाधव, ला.गिरीश शेटे साहेब, ला.राजेंद्र शिंदे, सचिवा ला. ललीता कोळवले, ज्योती कटेकर, मुन्नागीर गोसावी, डॉ अमित पावले, कैलास करंडे, सी.ए. अतुल कौलवार, मुकुंद कर्वे, मिलिंद देशपांडे, राजीव गुप्ता, महेश सावंत, डॉ सुजाता गुंडेवार, उर्मिला गुंडेवार, डॉ ऋजुता उत्पात, डॉ तृप्ती कौलवार, लता गुंडेवार, माधवी गुंडेवार, मंगल शिंदे, स्मिता अधटराव, वैशाली काशीद, मानसी कर्वे, डॉ सुरेखा बोरावके, नारायण उत्पात, प्रतीक्षा येलपले, डॉ रुचा सोनवणे, संजीवती खंडेलवाल, सुषमा झरकर, रेणुका देशांडे, सिमा राका, शोभा गुप्ता, सरीता गुप्ता,अर्चना मर्दा व पंढरपूर शहरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा