शेतमजूर महिलेला मारहाण करून लुबाडले - वाळूज येथील घटना
शिवशाही वृत्तसेवा मोहोळ
चार चोरटे स्वतःचा चेहरा काळा कापडाने झाकून आले. एका छत्तीस वर्षीय महिलेला मारहाण करीत तिच्या तोंडावर पावडर टाकून बेशुद्ध त्यानंतर अंगावरील 68 हजार रुपयांचे दागिने लुटल्याची घटना 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाळूज - वैराग रस्त्यावर वाळूज हद्दीत घडली.
याबाबत सग्जना बाबासाहेब खरात ( रा. वाळूज, ता. मोहोळ ) या शेतमजूर महिलेने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी तोंडावर काळे कापड बांधून आलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सुग्जना या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्या चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या. संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील गंठण, कानातील फुले, झुबे, चांदीची जोडवी असे 68 हजारांचे दागिने चोरून नेले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी धावले. त्यांनी प्रथम मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सहा नंबर स्वतः सग्जना खरात यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी चौघात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.
शेतात जाताना महिलांवर टाकली पुडी
विजयादशमी दिनी बुधवारी सकाळी दहा वाजता वाळूज - वैराग रस्त्यावरून नेहमीप्रमाणे शेतामध्ये पाय निघाल्या होत्या. इतक्यात कादे यांच्या शेताजवळ येतात स्वतःच्या तोंडावर काळे कापड बांधून द्राक्ष बागेतून समोरून दोघेजण आणि पाठीमागून दोघेजण आले. त्यांनी सग्जना यांच्या डोक्यावरून टोपली खाली ढकलून मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्यातील एकाने खिशातून एक पुडी काढून कसली तरी पावडर तोंडावर टाकली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा