उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप करीत महाविकास आघाडी सरकारने तो बंद केली होता. ही बहुचर्चित योजना शिंदे - फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात केली. गावे जलस्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात 39 लाख हेक्टर वरील शेती सिंचनाखाली आली असून, सुमारे 27 टीएमसी पाणी साठा तयार झाल्याचा दावाही त्यांनी केला. कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय नैसर्गिक शेतीवरील एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली आणली जाईल, 2016 - 17 मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर 9.5 लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी व उत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल यामुळे शेतकरी सुजलाम - सुफलाम होईल.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा