फिफामध्ये नोराचा दिसणार जलवा, भारतीयांचे विशेष लक्ष असणार
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप (fifa world cup 2022) म्हणजे फुटबॉल (football)प्रेमींसाठी पर्वणीच असते . ते या इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे फिफाचे आयोजकसुद्धा हा इव्हेन्ट जास्तीत जास्त आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात . फिफाचा ग्रँड ओपनिंग सेरेमणी तर जगभरात आकार्षणाचा विषय असतो. या कार्यक्रमात भारताची ऍटम स्टार डान्सर नोरा फतेह (nora fatehi)या वर्षीच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे. त्यामुळे भारतीयांचे देखील या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष असणार आहे.
हॉट आणि ग्लमरस अभिनेत्री नोरा फतेही हिने आपल्या नृत्याच्या जोरावर जगभरात आढळ स्थान निर्माण केले आहे. आयटम सॉंगपासून ते रियालिटी शो पर्यंत तिने तिचा प्रवास केलाच आहे. मात्र आता ती पुन्हा एकदा फिफा वर्ल्ड कप इव्हेंटमध्येदेखील आपला जलवा दाखवणार आहे. २० नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या फिफाच्या इव्हेंटमध्ये नोरा परफॉर्म करताना दिसणार आहे. तिच्या अगोदर जेनिफर लोपेज, शकिरा या इव्हेंट मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा