आलिशान बंगला, इंपोर्टेड गाड्या, घोडे आणि कुत्रे , अर्चना नाग हिचे शाही राहणीमान
शिवशाही वृत्तसेवा भुवनेश्वर
भुवनेश्वरच्या एका 28 वर्षीय मुलीने फक्त चार वर्षात कोट्यावधी रुपये कमवले आहेत इम्पोर्टेड गाड्या, आणि राजवाड्या सारखा बंगला, विलासी राणीमान यामुळे ही मुलगी नेमकी करते तरी काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र ही सर्व माया तिने वामार्गाने मिळवल्याचे आता उघड झाले आहे
भुवनेश्वर येथील युवती राजकारणी, व्यापारी, आणि चित्रपट निर्मात्यांना सेक्स रॅकेट मध्ये अडकवून ब्लॅकमेल करत होती या प्रकरणी 28 वर्षीय तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी तिच्याकडून पेन ड्राईव्ह आणि मोबाईल जप्त केले आहेत ज्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय आहे
अर्चनाला गरीबीत जगायचे नव्हते त्यामुळे झटपट पैसा मिळवण्याचा तिने अनैतिक मार्ग स्वीकारला होता अर्चना कडे राजवाड्यासारखा बंगला, इम्पोर्टेड गाड्या, परदेशी जातीचे कुत्रे, एक घोडा, असा विलासी सरंजाम आहे अर्चनाचे आई-वडील मजुरी करत होते 2015 साली अर्चना भुवनेश्वरला आली एका पार्लरमध्ये काम करत असताना तिने बालासोरच्या जगबंधू चंद यांच्याशी लग्न केले
या ब्युटी पार्लर मधूनच ती सेक्स रॅकेट चालवू लागली पोलिसांनी याप्रकरणी कोणत्याही व्हीआयपीचे नाव उघड केले नाही मात्र काँग्रेसचे आमदार एस एस सलुजा यांनी आरोप केला आहे की, "अर्चनाचे सत्ताधारी खासदार आणि मंत्र्यांशी संबंध आहेत, ते उघड झाल्यास पटनायक सरकार कोसळू शकते"
अर्चना आणि जगबंधू यांचे काही आमदार आणि व्हीआयपी सोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामुळे ओडिसामध्ये राज्यभर खळबळ उडाली आहे
अर्चना नाग धनाढ्य आणि सेलिब्रिटी लोकांशी मैत्री करायची, तिच्या सेक्स रॅकेटची कल्पना असल्याने हे लोक तिच्याकडे मुलींची मागणी करायचे अर्चना त्यांना मुली पुरवायची, मात्र त्यांच्या खाजगीतल्या व्हिडिओ क्लिप आणि फोटो काढायची नंतर ते उघड करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायची यातून चार वर्षात तिने तीस कोटीच्या वर माया जमवली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा