साठे परिवाराकडून दरेकरांचा स्वागतपर सत्कार
छोट्या पुढाऱ्याच्या हट्टासाठी दरेकर गेले त्याच्या घरीशिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे हे सध्या मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहेत. प्रवीण दरेकर पंढरपूरला येत असल्याची माहिती मिळाल्यावर, मराठा महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना महेश साठे यांनी विनंती केली. पुतण्या समर्थ साठे याचा हट्ट पुरवण्यासाठी नरेंद्र पाटील यांनीही दरेकरांना फोन केला. आणि प्रवीण दरेकर यांनी टाकळीतील विठाई निवासस्थान गाठले.
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर
भाजपाचे नेते, मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन, प्रवीण दरेकर यांनी पंढरपूरमधील बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या निवासस्थानास सदिच्छा भेट दिली. येथील विठ्ठल कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ करण्यासाठी ते पंढरपूरमध्ये आले होते.
मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर आणि पंढरपूरमधील अनेक नेतेमंडळींचा मोठा संपर्क आहे. विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे, यांच्या ते कायम संपर्कात असतात. रविवारी विठ्ठल कारखान्याचा गाळप शुभारंभ आटोपून ते पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या निवासस्थानास सदिच्छा भेट दिली. यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, टाकळी चे उपसरपंच संजय साठे उपस्थित होते.
महेश साठे यांच्या विठाई या निवासस्थानी प्रवीण दरेकर येताच फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. महेश साठे यांचे बंधू टाकळीचे उपसरपंच संजय साठे यांनी त्यांचे स्वागत केले. महेश साठे यांच्या मातोश्रींनी त्यांचे औक्षण केले. यावेळी साठे परिवार आणि टाकळी ग्रामस्थांच्या वतीने तुळशीहार घालून त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला.
यावेळी लक्ष्मी टाकळीच्या सरपंच सौ विजयमाला वाळके, ग्रामपंचायत सदस्या सौ रोहिणी महेश साठे, रेश्मा संजय साठे, समर्थ साठे आदींसह बापू डोंगरे, दादा कदम, मा.ग्रा.पं.सदस्य सुरेश भोसले, नागेश कुंभार, जोतीराम नलवडे, आदित्य साठे, सूरज साठे, शुभम माने, लखन आदमाने, अनिल (मामा) खुळे, रोहन बचुटे, अविनाश देवकते, विनायक वरपे, कृष्णा साठे, योगेश गायकवाड, पांडुरंग गायकवाड, समित भाई शेख, पप्पु पाटोळे, सागर कणसे, फिरोज (पप्पु) तांबोळी, सोनु चव्हाण, ओंकार कापसे, शिवा आदमाने, सोनु माने, गणेश कदम, विशाल कदम, विठ्ठल कोरके, किशोर नलवडे, प्रवीण मायने, तुषार कदम, विर भाई शेख तसेच टाकळीतील इतर ग्रामपंचायत सदस्य आणि नागरीक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा